Monday, February 21, 2011

किल्ले मांगी तुंगी

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


बागलाण सुपीक,सधन आणि संपन्न असा मुलूख. सह्याद्रीच्या उत्तर दक्षिणेची सुरुवात होते ती या बागुलगेड (बागलाण) विभागातूनच होते. येथे असणार्या दुहेरी पूर्व-पश्चिम रांगेला सेलबारी-डोलबारी असे संबोधण्यात येते. ताहराबादला पोहोचले की मांगी-तुंगीचे दोन सुळके आपले लक्ष्य वेधून घेतात. मांगी-तुंगी ही जैन लोकांची तीर्थक्षेत्रे.




गडावर जाण्याच्या वाटा :


मांगी-तुंगीला जायचे असल्यास नाशिक वरून सटाणामार्गेताहराबाद गाठावे. गुजरात मधून यायचे झाल्यास नीलमोरा रेल्वेस्थानकावरून अहुआ मार्गेताहराबाद गाठावे. ताहराबाद वरून भिलवाडी पर्यंत येण्यासाठी एस.टी. किंवा बससेवा उपलब्ध आहे. भिलवाडी हे मांगीतुंगीच्या पायथ्याचे गाव.भिलवाडीमध्येच जैनांची आदिनाथ,पार्श्र्वनाथ यांची मंदिरे आहेत. याला सुद्धा मांगी-तुंगीच म्हणतात. मांगी-तुंगी सुळक्यावर जाण्यासाठी गावातूनच रस्ता आहे. वीस मिनिटे रस्त्यावरून चालत गेल्यावर पुढे पायर्या
लागतात. सुमारे २००० पायर्यांचा चढ चढून गेल्यावर आपण एका कमानीपाशी पोहोचतो. येथून डावीकडे गेलो तर मांगी आणि उजवीकडे गेलो की तुंगी



राहण्याची सोय : गावात धर्मशाळा आहे. येथे १० ते १५जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय : भिलवाडी गावात जेवणाची सोय होते..

पाण्याची सोय : गावातूनच पाणी घेणे आवश्यक कारण गडावर पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ : ३ तास पायथ्यापासून

किल्ले सांकशी

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


पेण जवळील बळवली येथे सांकसे/सांकशीचा किल्ला आहे. या तालुक्याचे पुर्वीचे नाव सांकसे/सांकशीचा या किल्ल्यावरून पडले.


भौगोलिक स्थान
सह्याद्रिची एक डोंगररांग खंडाळा घाटाच्या अलिकडे माणिकगडाच्या पश्चिमेला पसरलेली आहे.या रांगेमुळे उत्तरेकडे पाताळगंगा तर दक्षिणेला बाळगंगा नद्यांच्या खोर्यांची विभागणी होते. या बाळगंगा खोर्यांच्या दक्षिणेला सांकशीचा किल्ला आहे.




स्थान

पनवेल पासून २०किलोमिटर अंतरावर असणारा सांकशीचा किल्ला घनदाट अरण्याने वेढलेला आहे. एका बाजूला मुंबई गोवा महामार्ग तर एका बाजूला कर्नाळा पक्षी अभयारण्य. पनवेलजवळ इरशाळ , प्रबळगड , माणिकगड , कर्नाळा यासारखे अनेक किल्ले आहेत. पण सांकशी हा यापेक्षा खूपच वेगळा आहे. पनवेलहून पेणच्या दिशेने गाडी निघाली की पनवेलहून १७ ते १८ किमीवर बळवली नावाच फाटा लागतो. या गावाच्या फाट्यावर उतरलं की आपली भ्रमंती चालू होते. बळवली हे छोटसं गाव. लाल मातीच्या भिंती , कौलारू घरं , घरासमोर अंगण , अंगणात असणारी विविध रंगांची फुलं हे सर्व पहातपहात गावाच्या शाळेकडची वाट पकडायची. इथून एक वाट किल्ल्याकडे गेलेली दिसते. विशेष म्हणजे गावाच्या आसपास जवळ कुठे किल्ला असेल याचा मागमूसही लागत नाही. किल्ल्याचा पायथा बळवलीपासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या बाहेरून लालतांबड्या मातीचा एक रस्ता वेडीवाकडी वळणे घेत भेंडेवाडीपर्यंत जातो. वाटेत आजूबाजूला सर्वदूर भाजीपाल्याचे मळे फुललेले दिसतात. पावसाची रिमझिम चालूच असते. सर्व डोंगरांनी एखाद्या नववधूसारखा शालू पांघरल्याचा भास होतो.



इतिहास

पूर्वी पेणचा उल्लेख तालुका सांकसे, सजा अवचितगड प्रांत कल्याण असाच ऐतिहासिक कागद पत्रातून आढळतो. सांकशी हा किल्ला राणाकंस या राजाने बांधला, त्याची राजधानी होती हेरंबपूर म्हणजेच आजचे हमरापूर. आजही हमरापूर गावात फिरले तर प्राचीन अवशेष आढळतात. राणाकंसच्या काळात सांकसई (बौद्रुद्दीन) किल्ल्यावरुन या सांकसे तालुक्याचा कारभार चाले. त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार म्हणून पुंड व पालेगार असत. हे पालेगार एकमेकांवर स्वारी करुन किल्ले ताब्यात घेत. सागर गडच्या पालेगाराने राणासंकच्या साकसईवर स्वारी करून त्याचे राज्य बुडविले.


गडावर जाण्याच्या वाटा


या पठारावरुन किल्ल्यावर जायला दोन वाटा आहेत. एक समोरच्या बाजूने तर दुसरी उजव्या कड्याला वळसा घालून वर जाते.

* समोरून किल्ल्यावर जाणारी वाट बाबूजी धीरे चलना अशी क्षणक्षणाला आठवण करून देणारी असल्याने कातळातील खोबण्या जरा जपूनच चढाव्या लागतात. उजवीकडे सुंदर कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहेत.
* टेकडीच्या पलिकडच्या बाजूला खालच्या पठारावरून येणारी दुसरी वाट दिसते. या वाटेवर अनेक टाकी खोदली आहेत.



गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे


* दर्गा-

तासा दीडतासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. किल्ल्याचा पायथा आला हे ओळखण्याची खूण म्हणजे बदुद्दीन दर्गा. हा दर्गा म्हणजे जवळपासच्या बारा गावांचं दैवत. हा दर्गा बराच जुना आहे. अलीकडेच या र्दग्याची नवी इमारत बांधली आहे. या र्दग्याच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जायला ठळकशी वाट आहे. किल्ल्याची चढण बरीच सोपी आहे. त्यामुळे मधल्या पठारावर जायला २० मिनिटं पुरतात. पठार संपूर्ण हिरवंगच्च असल्याने तिथं थांबण्याचा मोह टाळता येत नाही. पण वेळेचं गणित जुळवायला किल्ला लगेच चढायला लागणं उत्तम होते.

* पाण्याची टाकी-

यापैकी एका टाक्यातलं पाणी चक्क पिवळं आहे. थोडं अंतर चढून गेल्यावर कातळात खोदलेली टाकी लागतात. या किल्ल्यावर इतक्या प्रचंड संख्येने टाकी आहेत की हा किल्ला टाक्यांचा किल्ला म्हणून ओळखला जावा.


वैशिष्ट्य

समोर कर्नाळयाचं पक्षी अभयारण्य खुणावत असतं. हा परिसर नितांत रम्य गूढ वृक्षवेलींनी नटलेला असल्याने वेळ कसा आणि कधी जातो समजत नाही.

किल्ले महिपतगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

खेड तालुक्याच्या पूर्वेस १२ मैलांवर रसाळगड-सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. या मध्ये उत्तरेकडचा महिपतगड हा सर्वात उंच आणि विस्ताराने सुद्धा प्रचंड आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर आहे.हे तीन किल्ले एकमेकांच्या जवळजवळ असल्यामुळे अनेक ट्रेकर्स महिपतगड-सुमारगड-रसाळगड असा ट्रेक देखील करतात. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : महिपतगड हा नावाप्रमाणेच महिपत आहे. किल्ला तसा आकाराने फार मोठा आहे. चहुबाजूंचे कडे तुटलेले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तटबंदीची गरज भासत नाही. काही ठिकाणी जिथे कडा चढण्यास सोपा आहे तिथे तटबंदी उभारली आहे. सध्या मात्र ही तटबंदी पडून गेलेली आहे. किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा, आग्रेयेस यशवंत दरवाजा. सःस्थितीला हे दरवाजे नाममात्र उरलेले आहेत.






हे सर्व दरवाजे होते याच्या खुणा फक्त उरलेल्या आहेत. शिवगंगा दरवाजा जवळ एक शिवाची पिंड आहे. पुसाटी दरवाजा जवळ एक शिडी आहे. कोतवाल दरवाजा जवळ मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. पारेश्र्वराचे एक मोठे मंदिर किल्ल्यावर आहे. या मंदिरात राहण्याची सोय होते. मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या व्यतिरिक्त किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. अनेक प्रकारचे अवशेष या झाडीत लपलेले आहेत. या सर्वांचा अभ्यास होणे फार आवश्यक आहे. या किल्ल्यावर एक आगळावेगळा प्रकार दिसतो. तो म्हणजे न वापरलेल्या चुन्याचे अवशेष येथे पडलेले दिसतात.गड फिरण्यास दोन ते तीन तास पुरतात.





गडावर जाण्याच्या वाटा :

खेड वरून पहाटेच दहिवली गावाला जाणारी बस पकडावी. खेड ते दहिवली १ तासाचे अंतर आहे. दहिवली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. ही वाट लांबची असल्याने गडमाथा गाठण्यास ४ तास लागतात. या वाटेने जातांना आपल्याला दोन खिंडी पार कराव्या लागतात.२) : खेडवरून वाडीजैतापूरला जाणारी गाडी पकडावी. वाडीजैतापूरास उतरल्यावर मळलेल्या वाटेने वाडी बेलदार गावात यावे. वाडीजैतापूर ते वाडीबेलदार हे अंत दोन ते अडीच तासांचे आहे. वाडीबेलदारहून गडमाथा गाठण्यास १ तास पुरतो. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा संभव नाही.३) : रसाळगडवरून सुमारगड मार्गेसुद्धा महिपतगड गाठता येतो. हे अंतर साधारणतः: ७ तासांचे आहे. जंगल दाट असल्याने वाट चुकण्याचा फार संभव आहे.





राहण्याची सोय : पारेश्र्वर मंदिरात २० ते ३० जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय : आपण स्वतः: करावी
.पाण्याची सोय : बारामही उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : १) दहिवली गावातून - ४ तास

किल्ले लिंगाणा

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


इतिहास :

लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी आहेत ते फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा. मोर्यांचा पराभव केल्यावर शिवाजीने रायगडाजवळ हा किल्ला बांधला. इथल्या गुहेत, जे जुने कारागृह होते, एका वेळेस ५० कैदी ठेवत. ( रायगडाची जीवनकथा पृ. ३,४) १६६५ सालच्या पुरंदर तहामध्ये रायगड आणि त्या परिसरातले किल्ले लिंगाणा व बाणकोट महाराजांकडेच राहिले. ( रायगडाची जीवनकथा पृ. २४) लिंगाण्याच्या गिर्दनवाहीचे देव श्रीजननी व सोमजाई हे होत. त्यांच्या नवरात्राच्या उत्सवाच्या रायगडाच्या जमाखर्चातून तरतूद होत असे. ( रायगडाची जीवनकथा पृ. १३०) या देवतांना बकरे बळी देण्याची प्रथा होती.( रायगडाची जीवनकथा पृ. १३१) लिंगाणा किल्ला रायगडचा पूरक होता. त्याच्या डागडुजीचे काम रायगडाबरोबरच चालत असे. १७८६ सालापर्यंत त्यावरील वास्तूंची देखभाल केली जात असे असा उल्लेख आढळतो. त्यामध्ये गडावरील सदर, बुरूज, दरवाजे आणि धान्यकोठार यांचा समावेश असे. ( रायगडाची जीवनकथा पृ. १३५) तेथे पर्जन्यकाळात एक मनुष्य गस्त घाली. ( रायगडाची जीवनकथा पृ. १३९) रायगड नंतर लिंगाणा पडला. रायगडाच्या खोर्यात थोडी विश्रांती घेऊन इंग्रजांचे विजयी सैन्य २३ मे रोजी पाली पलीकडील मार्गास लागले. ( रायगडाची जीवनकथा पृ. १८८)


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे सामावून घेते. समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्र्वर आपल्याला दर्शन देऊन तृप्त करतो. या गुहेवरून पुढे आपण गेलो की आपण एका कोरडा हौदाला पार करून थोडेसे पुढे चांगल्या पाण्याच्या हौदापाशी येतो. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायर्या आहेत ज्यावरती असलेल्या गुहांपर्यंत जातो. इकडे आपल्याला एक बांधकाम नजरेस पडतं, जे अजूनही शाबूत आहे. ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे इथे दिवा लावत असत, जो कदाचित रायगडावर इशारा देण्यास वापरला जात असे. पण आज ही वाट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. जाण्यार्या वाटेवरूनच ही वास्तू दिसते. लिंगाण्याचे वैशिष्ट म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायचे म्हणजे वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येतं. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३-४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे, बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. या सुळक्यावरून पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे. आता थोडे याच्या इतिहासबद्दल जाणून घेऊ. रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती म्हणजे या गोष्टी या साठी अतिशय अनुकूल आहे.


जर कोणी पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमावणे हाच एक उपाय. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद. गडाचे क्षेत्रफळ सुद्धा कमी, जवळ-जवळ २५० मी. उत्तरेस ज्या पायर्या आहेत त्या टाक्यांकडे नेतात. ती वाटही बिकट झाली आहे. आजमितीस ज्या टाक्यातून पाणी भरले जाते तिथे एक शिवलिंग आहे, ते कुठून
आले हा प्रश्र्न पडतो.गडावर जाण्याच्या वाटा : या गडावर जाण्यास प्रथम आपणास यावे लागते ते महाडला. इथून पाने गावाला जाण्यास सकाळी ११.०० वाजता आणि सायंकाळी ४.०० वाजता गाडा आहेत. पाने गावातून साधारण पाऊण तासाच्या चढणीनंतर आपण लिंगाणा माचीवर पोहोचतो. तिथे पाणी भरून पुन्हा पाऊण तास चढल्यावर आपल्याला घसरडा वाटेवरून आपण अर्ध्या तासात आपण लिंगाणा सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपाशी येतो.राहण्याची सोय : गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे इथे राहू शकतात. हेच एकमेव रहाण्याचे ठिकाण आहे.


जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.

पाण्याची सोय : पिण्याचे पाणी गुहेच्या पुढे असलेल्या टाक्यांमध्ये आहे. तसेच सुळका चढतांना ज्या टप्प्यावर बांधकाम लागते तिथे मुख्य वाटेपासून डावीकडे घसरडा वाटेवर थोडा पुढे पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्यापासून ८ - ९ तास.

सूचना : प्रस्तरारोहण आवश्यक. 

किल्ले धोडप

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी

नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची पूर्वपश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळा ही होय. अजंठा-सातमाळा रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे. या साखळीमधील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजे धोडप हा होय. शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दूरवरुन स्पष्टपणे ओळखू येतो.
धोडपला येण्यासाठी कळवणहून ओतूर गाव गाठल्यास उत्तरेकडील डोंगरदांडाने धोडपवर चढाई करता येते. डोंगराच्या पठारावर धोडपचा माथा उंचावलेला आहे. उत्तरेकडून अथवा दक्षिणेकडून आपण चढाई करुन प्रथम या पठारावर येतो. या विस्तृत पठारावर असलेल्या झाडीझाडोप्यामध्ये लपलेल्या अनेक वास्तू आपल्याला पहायला मिळतात. यामध्ये अनेक जोती, मंदिरे, पुष्करणी, मुर्ती, कबरी आढळतात.
या पठारावर सोनारवाडी नावाचे छोटेसे गाव म्हणण्यापेक्षा छोटीशी वस्ती आहे. या वस्तीच्या जवळूनच गडाच्या माथ्यावर जाणारी वाट आहे. काही कातळकोरीव पाय-या कड्यावर आहेत. एका बोगदेवजा मार्गाने आपण या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो. या माथ्यावर सुळक्यासारखा भाग आहे. या सुळक्यावर चढाई करण्यासाठी गिर्यारोहणाच्या साधनांची तसेच कौशल्याची गरज आहे.
हा सुळका उजव्या बाजूला ठेवून आपण मळलेल्या वाटेने सुळक्याच्या खाली असलेल्या गुहेमध्ये पोहोचतो. यातील एका गुहेत पिण्यायोग्य पाणी आहे. दुस-या गुहेत एक मंदिर आहे. ही जागा मुक्कामाच्यादृष्टीने योग्य आहे. गुहेच्या पुढे सरळ गेल्यावर निमुळती होत जाणारी कातळभिंत आहे. या अरुंद भिंतीला मधेच तोडण्यात आले आहे. पन्नास फूट खोली आणि पस्तीस फुटांची लांबी असलेला मधला भाग छन्नीने कोरुन काढलेला आहे. त्यामुळे त्या बाजूने कोणी शत्रू येथपर्यंत पोहचू नये अशी ही व्यवस्था आहे. हा माचीसारखा भाग मोकळा असून उंचावर असल्यामुळे येथून गडाचा परिसर तसेच धोडपचा वरचा सुळका उत्तम प्रकारे दिसतो. येथून चांदवड, इंद्राई, साडेतीन रोडगा, राजदेहेट, कांचन मंचन, विखारा, कन्हेरा, खळ्याजवळ्या, सप्तशृंग, अहीवंतगड, अचला अशी सातमाळा रांग पहायला मिळते. दक्षिणेकडील विस्तृतप्रदेश न्याहाळता येतो. तसेच उत्तरेकडील साल्हेर सालोटा तसेच चौल्हेरचेही दर्शन होते. साधारण २५ किल्ले तरी धोडपवरुन दिसतात




इतिहास 


राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. येथेच त्यांची दिलजमाई झाली होती. पुढे १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला.
 




जाण्याची सोय 

धोडप किल्ल्याच्या पायथ्याला धोडांबे नावाचे गाव आहे. हे किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला असून ते नाशिकला गाडीमार्गाने जोडलेले आहे. नाशिककडून धुळ्याकडे आग्रा महामार्ग क्र.३ जातो. या राष्ट्रीय महामार्गावर चांदवडच्या अलिकडे वडाळाभोईचा थांबा आहे. या वडाळाभोई मधून धोडांबेकडे जाण्यासाठी गाडीरस्ता आहे.


किल्ले साल्हेर

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसूबाईचा,तसा गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेरचा.बागलाण हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नांमुळं समृध्द झालेला प्रदेश.येथील भूमी तशी सुपिकच त्यामुळे येथील लोकांचे रहाणीमान तसे थोडे उंचावलेले.तरीही डोंगरी भागात कोकण ,भिल्ल सारख्या काही आदीवासी जमाती रहातात. साल्हेर गडाचा घेरा साधारणपणे ११ कि.मी.असून व्यापलेले क्षेत्र ६०० हेक्टर आहे.


इतिहास :साल्हेर गड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे.जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बाण सोडला तो याच भूमीवरून.असे पौराणिक स्थान असलेल्या साल्हेरचे शिवकालीन इतिहासातील स्थान देखील महत्वाचे आहे, ते येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईमुळे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला.त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली .ते एकून पातशहा कष्टी झाला ,नि म्हणाला ,'काय इलाज करावा ,लाख लाख घोडाचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले. आता कोण पाठवावे '
तेव्हा पातशहाने 'शिवाजी जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही' असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले.
मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले 'तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले. ' हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे ' अशी पत्रे पाठविली.
त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव तर दुसरीकडून पेशवे, उभयता सालेरीस आले,आणि मोठे युध्द झाले. सभासद बखरीत याचा उल्लेख् खालील प्रमाणे आढळतो ''चार प्रहर दिवस युध्द जाहले मोगल, पठाण, रजपूत, तोफांचे, हत्ती, उंट आराबा घालून युध्द जाहले. युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की , तीन कोश औरस चौरस ,आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते . हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले पूर वहिले.रक्ताचे चिखल जाहले.त्यामध्ये रुतो लाबले ,असा कर्दम जाहला. मराठांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला. युध्दात प्रचंड प्रमाणावर हानी झाली. या युध्दात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता,पैकी १० हजार माणसे कामीस आले. सहा हजार घोडे ,सहा हजार उंट, सव्वाशे हत्ती तसेच खजिना ,जडजवाहीर ,कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली.
या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली. सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले. 'सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे . भारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा,असा शूर पडला.' विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले.खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत ,मोरोपंत पेशवे, आनंदराव ,व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले.हा पराभाव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो - पातशहा असे कष्टी जाले .'खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिधली असे वाटते.
आता शिवाजी अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे. आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही.' असे बोलिले. मोगलांच्या सैन्याशी समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता ,त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता.असा मोठा विजय यापूर्वी कधाही मिळाला नव्हता.या युध्दात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युध्दकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला .साल्हेर जिंकल्यावर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला.त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.






गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

: वाघंबे मार्गेगडावर आल्यास उजवीकडे आणि साल्हेरवाडीहून गडावर आल्यास डावीकडे वळल्यास पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर काही भग्र पावलेल्या मंदिराचे अवशेष आढळतात. पुढे थोडयाच अंतरावर पाण्याची दोन टाकी असून समोर गंगासागर तलाव दृष्टीस पडतो. तलावाच्या बाजुलाच रेणुका मातेचे आणि गणेशाचे छप्पर नसलेले मंदिर आहे. या मंदिराच्या जवळून दोन वाटा फुटतात. उजवीकडे जाणारी वाट सरळ एका पाण्याच्या टाक्यापाशी घेऊन जाते. टाक्यांसमोरच एक यज्ञवेदी आहे. जवळच एक मूर्तीदेखील आहे. मंदिरापासून वर चढत जाणारी वाट आपल्याला तीन गुहांपाशी घेऊन जाते. गुहांच्या समोर मारूतीचे मंदिर आहे
. या गुहांमध्ये रहाता येऊ शकते. गुहांशेजारची वर जाणारी वाट गडाच्या अत्युध शिखरावर घेऊन जाते. या शिखरावर श्री परशुरामाचे मंदिर आहे. या उंच गडमाथ्यावर काहीशा ढासळलेल्या अवस्थेत असलेल्या या मंदिरात परशुरामांची मूर्ती व पादुका आहेत, आणि जोडीला भान हरपून टाकणारा निसर्ग. येथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. येथून संपूर्ण बागलाण विभाग दिसतो. हा गड डांग - गुजरात आणि बागलाण यांना जोडणा-या व्यापारी वाटेवर असल्याने संरक्षण दृष्टा महत्वाचा होता. समोर दक्षिण बाजूला अजंठा - सातमाळा डोंगरातले धोडप, इखारीया हे सुळके दिसतात. पूर्वेकडे मांगी-तुंगी, तांबोळया, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड आणि सालोटा नजरेस पडतात. समोरच हरणबारीचे धरण लक्ष वेधून घेते.





गडावर जाण्याच्या वाटा :

गडावर जाण्यासाठी प्रमुख दोन मार्ग आहेत.वाघांबे मार्गेः साल्हरला जाण्यासाठी नाशिक-सटाणामार्गेताहराबाद गाठावे.गुजरातमधून यायचे झाल्यास डांग जिल्हयातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे.ताहराबादहून मुल्हेरमार्गेवाघंब अशी एस.टी.अथवा जीप सेवा देखील उपलब्ध आहे.वाघंबे गाठल्यावर गावातूनच साल्हेर-सालोटा यांच्या खिंडीतून साल्हेरला जाणारी वाट आहे.वाटेत कुठेही पाणी नसून खिंडीपर्यंत चालणारी वाटचाल दमछाक करणारी आहे.या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात.या वाटेने गडावर जातांना चार दरवाजे लागतात.तिसर्या ते चौथ्या दरवाजाच्या दरम्यान कडात खोदलेल्या १८ते २०गुहा आहेत.चौथ्या दरवाजाच्या कमानीवर एक शिलालेख आढळतो. येथून आत आल्यावर समोरच एक पठार दिसते.

साल्हेरवाडी मार्गेः साल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे.साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते.एक सटाणा-ताहराबादमुल्हर-साल्हेरवाडी असा आहे.साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट दमछाक करणारी आहे.या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी आपण गडावर पाहचतो.वाट मळवलेली असल्याने चूकण्याची शक्यता नाही.या वाटे कुठेही पाणी नाही.माळदर मार्गेः गडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरात नाही.ही वाट माळदर गावतूनच जाते.सटाण्याहून एस.टी.ने माळदरला जाता येते.ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधून जाते. या वाटेने गडावर जायला साधारण तीन तास पुरतात.


राहण्याची सोय : गडावर असलेल्या तीन गुहांमध्ये रहाण्याची व्यवस्थित होऊ शकते
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतःच करावी.
पाण्याची सोय : गंगासागर तलाव व त्याच्या बाजूस असणारी दोन पाण्याची टाकी यातील पाणी पिण्यास योग्य आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : वाघांबे मार्गेअडीच तास , साल्हेरवाडी मार्गेतीन तास, माळदर मार्गेतीन तास

किल्ले महिमानगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी


किल्ला माण तालुक्यात दहिवाडी नावाच्या खेडाच्या पश्चिमेला ५.५० मैलांवर शिद्रिबुद्रुक खेडात येतो.सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा कमी पावसाचा त्यामुळे पावसाचे दुर्भिक्ष याच्या पाचवीला पुजलेलं


इतिहास :

साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले त्यापैकीच एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते.किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे
आपही वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे चालू आहे.



गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :


गडाच्या प्रवशद्वाराच्या चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. प्रवशद्वारातून आत शिरल्यावर समोरच हनुमानाचे बिनछप्पराचे देऊळ दिसते.त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पायया दिसतात.येथून थोडे पुढे गेल्यावर समोरच पाण्याचे सुंदर तलाव आहे.तलाव ब-यापैकी खोल आहे.या तलावाला बारामही पाणी असते.त्याच्याच बाजूला वाडांचे भनावशेष दिसतात.येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते.गडाच्या ईशान्येस गडाची एक सोंड लांबवर गेलेली दिसते.या सोंडेला पकडून एक डोंगररांग पुढे गेलेली आहे.या सोंडेवर थोडेफार वाडाचे अवशेष दिसतात.किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुला असणारी तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे.गड फिरण्यास साधारण अर्धातास पुरतो किल्ल्यावरून वर्धनगड,ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर दिसतो.


गडावर जाण्याच्या वाटा :



१. महिमानगड गाव मार्गे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा सातारा - पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुढे १२ कि.मी अंतरावर असणा-या महिमानगड फाटावरून पुढे जातो.दहिवडी कडून साता-याकडे येणा-या रस्त्यावरुन सुध्दा महिमानगड फाटावर उतरता येते. महिमानगड फाटावरून महिमानगड गावात जाण्यास वीस मिनिटे लागतात.फलटण -दहिवडी मार्गेसातारा गाडी किंवा सातारा पुसेगावमार्गेपंढरपूर जाणारी गाडी देखील महिमानगड फाटापाशी थांबते.महिमानगड गावातूनच किल्ल्यावर एक पायवाट जाते.या वाटेने गड गाठण्यास २५ मिनिटे पुरतात.गडावर चढतांना त्याच्या अभेपणा प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत असतो.गावाच्या जिल्हापरिषदेच्या कायार्लया समोरूनच एक वाट गडावर जाते.वाट थेट प्रवशद्वारातच घेऊन जाते.प्रवशद्वाराचे बुरुज आजही चांगल्या अवस्थेत आहेत.



राहण्याची सोय : किल्ल्यावर नाही.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणच करावी.
पाण्याची सोय : गडावर नाही
.जाण्यासाठी लागणारा वेळ : महिमानगड गावातून अर्धातास.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतुत जाता येते.