Wednesday, February 23, 2011

किल्ले नरनाळा

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

अकोला जिल्ह्यातील हा अतिशय दुर्गम गिरिदुर्ग.

स्थान

अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्या पासुन याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासून गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.

भौगोलिक माहिती

गड जमीनीपासून ३१६१ फुट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकर असून गडाच्या कोटाची (तटबंदी) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून तेलीयागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.

किल्ल्याबद्दल

गडाच्या प्रवेशाला पाच दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गुळफुटाने वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.




पाहण्यासारखी ठिकाणे

गडावर आजही राणी महाल व बाजूची मस्जिद अस्तित्वात आहे. त्या समोरचा सभामंडप आता नसला तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराचे भान करून देतात. सरळ पुढे गेल्यास तेला- तूपाचे टाके लागतात. खोल टाक्या असून त्यात विभागणी केलेली आहे; आणि त्यांना युध्दकाळात तेल-तूप साठवण्यासाठी वापरल्या जात असे.

गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्या अंतरावर 'नऊगजी तोफ' दिसते. ही तोफ अष्टधातुची असून इमादशहाच्या काळात गडावर आणल्या गेल्याचे बोलले जाते. तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे. तोफेचे तोंड गडपायथ्याच्या शहानुर गावाकडे रोखलेले आपणास लक्षात येते. बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे. या खोर्यात चंदन व साग झाडांची फार दाट पसरण आहे.


ऐतिहासिक महत्व


गड नेमका कुणी आणि कोणत्या काळात बांधला या बाबत नक्की माहिती नाही पण स्थापत्य व ऐतिहासिक पुराव्या वरून हा गड 'गोंड राजांनी' बांधला असल्याचे बोलले जाते. गडावर नागपूरकर भोसले कालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे. गडावर राम तलाव व धोबी तलाव यांसहित २२ तलाव आहेत. गडाला ६४ बुरूज आहेत. भक्कम तटबंदी व दुर्गम पहाडी यांच्या सहीत हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून विशेषतः माळव्यातुन येणा-या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. या गडावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

किल्ले बाळापूर

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

विदर्भातील अकोला हा महत्त्वाचा जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मान आणि महीषी या नद्यांच्या संगमावर बाळापूर वसलेले आहे. जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर असून ते बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे.

मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याश्या उंचवट्यावर बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरुज बांधून संरक्षणाची सिद्धता केलेली आहे.

बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करुन आहे. याचे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महीरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख तिसरा दरवाजा आहे. यालाही महीरप केलेले आहे.

दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करुन त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.

तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायरी दिसते.
त्यावरून
चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरुन किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरुन बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करुन देतात.






आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजुंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.

बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जुन पहावी अशीच आहे.

किल्ले तुंग

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

किल्ल्याच्या नावावरून आपल्या सर्वांना असेच वाटेल की, किल्ला चढायला खरोखरच कठीण आहे मात्र किल्ला चढण्यास फारच सोपा
आहे. पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गेचालणा-या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड ,विसापूर ,पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.

इतिहास

: या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.


DSC01854.JPG

DSC01854.JPG

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

गडमाथा फारच आटोपता असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोडाच अंतरावर गडावर जाण्यासाठी पाय-या लागतात. पाय-यांच्या वाटेत थोडाच अंतरावर हनुमान मंदिर लागते.पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आत शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक आढळतो. येथूनच
बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे.बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. यात पावसाळ्या शिवाय इतर ऋतूत २ ते ३ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. अशा प्रकारे एक दिवसात किल्ला पाहून लोणावळ्याला परतता येते.





गडावर जाण्याच्या वाटा :
या गडावर जाणा-या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर जाण्यास साधारणतः ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो.घुसळखांब फाटामार्गेः गडावर जाण्यासाठी लोणावळा स्टेशनवर पोहचावे. येथून भांबूर्डेअथवा आंबवणे कडे जाणारी एस.टी पकडून २६ कि.मी अंतरावरील घुसळखांब फाटापाशी उतरावे. या फाटापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ कि.मी अंतरावरील तुंगवाडीत
पोहोचतो. येथून गडावर पोहचण्यास ४५ मिनिटे लागतात.
ब्राम्हणोली-केवरे : अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोनापेठेत उतरावे आणि काळे कॉलनी चा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. या गावातून लाँच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावा पासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.
तुंगवाडीच्या फाटा मार्गेः जर लाँच ची सोय उपलब्ध नसेल तर तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एस.टी महामंडाळाची कामशेत-मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीच्या फाटावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपणं तुंगवाडीत पोहचतो.




राहण्याची सोय :
तुंगवाडीतील मारुतीच्या मंदिरात ६ ते ७ जणांची राहण्याची सोय होते. तुंगवाडीत भैरोबाचे देखील मंदिर आहे यात २० जणांना राहता येते.






जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : मंदिरा जवळच गावात पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्यापसून ४५ मिनिटे

किल्ले कुर्डूगड - विश्रामगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

पुण्यापासून अवघ्या ९० कि.मी. पश्चिमेस असणारा हा एकाकी लहानखुरा किल्ला .त्याला विशेष प्रकाशात आणले ते कै.दत्तोबा पासलकर यांनी .
सह्याद्रीच्या कुशीत पुणे व रायगड जिल्ह्यांच्या सरहद्दीवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात ह्याचा समावेश होतो, माणगावपासून २० कि.मी. वरील ह्या किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंचीवर आहे समुद्रसपाटीपासून जरी उंची कमी असली तरी खाडी चढण किवा लांबच लांब उजाड मार्गाने हा किल्ला जवळ करावा लागतो .म्हणून हा सतत उपेक्षितच राहिला आणि राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे, चित्तथरारक प्रसंगही येथे घडल्याचे ज्ञात होत नाही.
किल्यानाजीकच पायथ्याशी चरी कुर्डाई देवीचे मंदिर आहे .त्यावरूनच किल्ल्यास किल्ले कुर्डू हे नाव मिळालं.बाजी पासलकरांनी विश्रांतीकालासाठी या किल्ल्याचा उपयोग केल्याने त्यासच विश्रामगड हेही नामाभिमान प्राप्त झाले असे समजते



किल्ल्यावर कसे जायचे ?
 
पुण्याहून सकाळी व दुपारी अशा दिवसात दोनदा एस.टी. बसेस सुटतात व त्या आपणास थेट मोसे खुर्द ह्या गावी नेतात .तेथून गाडीरास्त्याने आद्माल ,पडल्घर ,भुईनी ,मुगाव ,कोळशी ह्या रस्त्याने धामणव्हळ गाव उजवीकडे ठेवून वाघजाईच्या ह्गाताने खाली कोकणात उतरता येते .नुकत्याच पूर्ण झालेल्या वरसगावच्या बाजी पासलकर धरणामुळे हा रस्ता आता पाण्याखाली गेला आहे .गर्द वृक्षराजीतील घटने गेले असता सुळक्याप्रमाणे दिसणारा कुर्डू किल्ला नजरेस पडतो .पायथ्यावर असणाऱ्या कुर्डू पेठ ह्या गावातून अवघ्या १५-२० मिनिटांत आपणास किल्यावर पोहचता येते

पाहण्यासारखे बरेच काही 

किल्याच्या पायथ्याशी कुर्दैचे अलीकडेच जीर्णोद्धार केलेले मंदिर व कुर्डेश्वर महादेवाचे मंदिर आहे. देवीचे देवळाकडून म्हणजेच पश्चिमेकडून थोडीशी चढण चढून गेले म्हणजे पाण्याचे टाके लागते. कुर्डू पेठ ह्या गावास येथूनच पाणीपुरवठा होतो .गावाची वस्ती प्रामुख्याने कोळी व धनगर जमातीची आहे .तेथून थोडेसे अवघड कड्यावरून मुरमाड ,घसरड्या वाटेने आपण एका प्रचंड शिलाखांडाशी येतो. येथून उत्तरेकडील हनुमान बुरजावर आपण येतो .या बुरुजावरच १ मीटर उंचीची हनुमानाची मूर्ती नजरेस पडते .
याच बुरजावर उभे राहून दक्षिणेकडे नजर टाकल्यास एक छोटा सुळका एका मोठ्या सुळक्यापासून अलग झालेला दिसतो दिसतो .या दोघांच्या मधील खिंडीत थोड्याश्या कौशल्याने जाता येते. अगदी खिंडीत आपणास एक नैसर्गिक खिडकी आढळते .तेथून कोकणातील दूरवरचा मुलुख सहज नजरेस पडतो 

किल्ले कावनई

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


किल्ले कावनई
इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे पूर्वेकडे असणा-या सह्याद्रीच्या रांगेला कळसूबाई रांग म्हणतात.यात कळसूबाई ,अलंग,कुलंग ,अवंढ - पट्टा हे किल्ले येतात तर पश्चिमेकडे असणा-या रांगेत त्रिंगलवाडी,कावनई ,हरीहर,ब्रम्हगिरी,अंजनेरी हे किल्ले येतात.या परिसरात भ्रमंती करायची असल्यास इगतपुरी किंवा घोटीला यावे.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : 
किल्ल्याचा दरवाजा आजही ब-यापैकी शाबूत आहे.दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हातालाच गुहा आहे.गुहेत ४ ते ५ जणांना राहता येईल एवढी वाट आहे.येथूनच माथ्यावर जाण्यास जागा आहे.गडमाथ्यावर पोहचल्यावर दक्षिणभागात एक तलाव आहे आजुबाजुला पडक्या वाडांचे अनेक अवशेष आहेत.गडाच्या पश्चिम भागात एक बुरुज आहे.बुरुजाच्या जवळच पाण्याचे टाके आहे.गडमाथा तसा लहानच त्यामुळे फिरण्यास अर्धा तास पुरतो.किल्ल्यावरून कळसूबाई रांग,त्र्यंबक रांग,त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.


गडावर जाण्याच्या वाटा : 
१.  कावनई मार्गे कावनई ला जायचे असल्यास इगतपुरीला किंवा घोटीला यावे.येथून कावनई गावाकडे जाणारी बस पकडावी.कावनई गाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.इगतपुरीहून अप्पर वैतरणा ला जाणारी बस पकडून वाकी फाटावर उतरावे. वैतरणा कडे जाणारा रस्ता सोडून उजवकडची वाट पकडावी.या फाटयापासून १ तासाच्या चाली नंतर आपण कावनई गावात पोहचतो.गावात कपिलाधारातीर्थचा नावाचा आश्रम आहे.गावात शिरल्यावर उजव्या हातालाच किल्ला दिसतो.किल्ल्याची एक सोंड गावात उतरलेली आहे.या सोंडेवरून चढत जायचे अर्ध्या तासाच्या चालीनंतर वाट उजवीकडे वळते आणि चिमणीपाशी येऊन थांबते.पुढचा चढाई चिमणीतूनच आहे.येथे सोपे प्रस्तरारोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन पोहचतो.गावापासून इथपर्यंत पोहचण्यास १ तास पुरतो.


राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे यात ४ ते ५ लोकांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय : आपण स्वतः करावी

पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.यात एप्रिल पर्यंत पाणी असते.

जाण्यासाठी लागणारा वेळ : कावनई गावातून अर्धा तास.  


किल्ले घनगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

मुळशीच्या पश्चिमेला एक मावळ भाग आहे यालाच 'कोरसबारस' मावळ म्हणतात.याच मावळात येणारा हा घनगड.आड बाजूला असलेला हा किल्ला मात्र आपल्यासारख्या ट्रेकर्सला नेहमीच खुणावत राहतो.येथील जनजीवन शहरी सुखसोयींपासून दुरावलेले.


इतिहास :
किल्ल्याच्या बद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही.मात्र किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि 
नंतर मराठ्यांकडे आला.





गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

किल्ल्यावर प्रवेश केल्यावर डाव्या हाताला असणारी टेकडीवर जाणारी वाट पकडावी.या वाटेने वर जातांना एका पडक्या दरवाजातून आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो.गडावर पडक्या घरांचे अवशेष आहेत.पाण्याची एक ते दोन टाकी आहेत आजमितिस मात्र ती फुटलेली आहेत.बाकी किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत.किल्ल्यावरून सुधागड,सरसगड अणि तैलबैला ची भिंत हा परिसर दिसतो.तसेच नाणदांड घाट ,सव्वष्णीचा घाट ,भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुध्दा दिसतात.



गडावर जाण्याच्या वाटा :
 ऐकोलेमार्गे :
किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे अणि ती ऐकोले गावातूनच वर जाते.मुंबईकरानी अणि पुणेकरांनी लोणावळा गाठावे.लोणावळ्याहून भाबुर्डेकडे जाणारी एस टी पकडावी.लोणावळा ते भांबुर्डेहे अंतर ४० कि.मी चे आहे.भांबुर्डेगावातून थेट ऐकोले गावात यावे .भांबुर्डेते ऐकोले हे साधारणतः अंतर २० मिनिटाचे आहे.ऐकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे.गावातून बाहेर पडल्यावर डावीकडची वाट पकडावी.ही वाट थेट किल्ल्यावर जाते.यावाटेने पुढे जातांना गारजाई देवीचे मंदिर लागते.या मंदिरात ''श्री गारआई महाराजाची व किले घनगडाची '' असा शिलालेख कोरलेला आहे.मंदिराच्या समोरच एक तोफगोळा पडलेला आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूनेच किल्ल्यावर जाणारी वाट आहे.येथून थोडाच वेळात आपण एका कातळकडापाशी येऊन पोहचतो.गडावर जाणारी वाट इग्रजांनी सुरुंग लावून चिणून काढली आहे.१५ फुटाच्या ह्या कडावर थोडे प्रस्तरारोहण करून चढून जावे लागते.आवश्यक असल्यास १५ फुटाचा दोर लावावा.हा कडा पार केला की आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो.


राहण्याची सोय : वर राहण्याची सोय नाही मात्र गारजाई च्या मंदिरात २० लोकांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही
जाण्यासाठी लागणारा वेळ : ऐकोले गावातून अर्धातास,
जाण्यासाठी उत्तम कालावधी -सर्व ऋतुत.


किल्ले केंजळगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


किल्ले केंजळगड
तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्र्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिडाची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठा पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो. केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.


इतिहास : 
बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता. म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्र्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्लिटझर याने दुर्गाचा ताबा घेतला.




गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : 
कोल्प्रयाहून सुमारे दोन तासांच्या आल्हाददायी निसर्गभ्रमणानंतर आपण केंजळगडाच्या 
खांद्यावरजाऊन पोहचतो. माचीवर पूर्वेकडच्या अंगाला सपाटीवर पाच, सात खोपटांची वस्ती आहे. तिला ओव्हरी म्हणतात. मागे केंजळचा भला मोठा खडक उभा असतो. या काळ्या पहाडाच्या माथ्यावर मजबूत झाडी व गवताचे रान माजलेले दिसते. येथे मार्गदर्शक नसेल तर झाडीत उगाच भटकत बसावे लागते. म्हणून मार्गदर्शकाच्या सहाय्याने झाडीतून जाणा-या वाटेने वर चढू लागले'की आपण गडावर पोहचतो. माथ्यालगतच या गडाचे वैशिष्ट आपल्या निदर्शनास येते, ते म्हणजे एवढा उंचीवर उभ्या कातळात कोरून काढलेल्या पाय-या . ज्या किल्ल्याच्या पाय-या फार श्रम करून अवघड जागी खडकात कोरून काढल्या आहेत अश्या मोजक्या किल्ल्यांपैकी केंजळगड अग्रभागी आहे. डोंगर शिखरावरील कातळात पूर्ण लांबीच्या ५५ उंच उंच पाय-या आहेत. 


रायरेश्र्वरहून येतांना काळ्या कातळभिंतीपाशी येऊन पोहोचलो की, उजव्या हातास वळसा घालून गेले की, पंधरा वीस मिनिटांत आपण त्या कातळ पाय-यांपाशी येऊन पोहचतो. पाय-याच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते. या गुहेत काळ्या रंगाचे कोळी मोठा संख्येने आढळतात. या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पाय-यांच्या सुरवातीला दोन्ही बाजूला देवडयांचे अवशेष आहेत. पाय-या संपता संपता येथे पूर्वी दरवाजा होता हे सांगणारं जोते फक्त दिसते. माथा गाठल्यावर तटाजवळ एक प्रशस्त खोदलेले तळे आहे. या तळ्याचे पाणी मोठे मधुर आहे.
गडाचा घेर हा लंबवर्तुळाकार आणि छोटाच आहे. चारही बाजूंनी उभे ताशीव कातळ कडे आहेत. काही ठिकाणी मजबूत अशी तटबंदी आहे. गडाच्या एका अंगास वाई प्रांताच्या दिशेस थोडी फार तटबंदी आढळते. एक पडझड झालेला बुरूजही आहे. एक सुकलेले टाके तसेच काही इमारतींचे भग्रावशेषही आढळतात. येथेच वरच्या अंगास एक चुन्याचा घाणा आहे. पुढे एक चांगली मजबूत अशी इमारत आढळते. साधारण कोठारासारखी तिची रचना आहे. काही कागदपत्रांच्या उल्लेखानुसार हे दारूचे कोठार असावे. येथून पुढे रायरेश्र्वराच्या दिशेने ओसाड माळ आहे. कोठारापासून दुस-या दिशेने चालत गेले असता आणखी एक चुन्याचा घाणा आढळतो. दोन चुन्याचे घाणे असणे म्हणजे गडावर मोठा प्रमाणावर बांधकाम झालेले असले पाहिजे असे समजते. पण गडमाथ्यावर सर्व बाजूला असलेल्या छातीपर्यंत वाढलेल्या गवतामुळे ही बांधकामे शोधणे कठीण होऊन बसते. या दुस-या चुन्याच्या घाण्यापुढे काही अंतरावर एका जुन्या मंदिराचे अवशेष आहेत.छप्पर नसलेल्या या देवळात केंजाई देवीची मूर्ती आहे. इथल्या रांगडा निसर्गाला साजेश्या रांगडा देवतांच्या इतरही काही मुरत्या आसपास आहेत.केंजळगडाची ही डोंगररांग माथ्याकडे हिरवाईने नटलेली दिसते. पावसाळ्या नंतर नजीकच्या काळात आल्यास सारी धरणी हिरव्या गवताने आच्छादलेली असते. अशा अमोघ सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण ठरतो.


गडावर जाण्याच्या वाटा : 
रायरेश्र्वरमार्गेः- रायरेश्र्वरच्या देवळाकडे पाठ करून उजवीकडील शेताच्या बांधावरून टेकडीखाली उतरले की समोर केंजळगडाचा घेरा, बालेकिल्ला आणि रायरेश्र्वरला जोडणारी डोंगररांग स्पष्ट दिसते. आणखी दहा मिनिटे चालल्यावर पठार संपते. तेथून खाली उतरायला एक लोखंडी शिडी आहे. शिडीने खालच्या धारेवर उतरावे. उजवीकडे खाली खावली गाव दिसते. समोर केंजळगडाच्या पाठीमागे असलेल धोम धरणातील पाणी आणि त्याच्याच पलीकडे असलेला कमळगडाचा माथा आपल्याला खुणावत असतो. त्याच वाटेने दीड-एक तास चालत राहिले की केंजळगडाच्या उभ्या कातळभिंतीशी येऊन पोहचतो. 


कोर्लेमार्गेः- भोरहून सकाळी साडेसात वाजता कोर्लेया गावी एस्.टी. बस येते. तासाभरात बस कोर्ल्याला पोहचते. तेथून पश्चिमेला केंजळचा मार्ग जातो तर उत्तरेला रायरेश्र्वराचे पठार दिसते. भोरहून आंबवडाला दिवसातून दहा बसेस येतात. आंबवडाला उतरूनही कोर्ल्याला पायी ( साधारण ६किमी ) जाता येते. चिखलवडे, टिटेघरकडे येणा-या एस.टी. नेही कोर्लेगाठता येते. कोर्ल्याहून गडावर दोन तासात पोहचता येते.
वाईमार्गे-गडावर येण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. वाईहून खावली गावी यावे. खावली गावी जेथे एस.टी. थांबते तेथून थोडे पुढे ५ - १० मिनिटे चालल्यावर उजवीकडे गडावर जाणारा रस्ता दिसतो. अर्धा गड चढून गेल्यावर थोडी वस्ती लागते. येथपर्यंतचा रस्ता ही एक कधी सडक आहे. येथून पुढे पायवाटेने अर्धा - एक तासात आपण गडावर येतो. गडाच्या कातळाजवळ आल्यावर आपण डोंगरसोंडेवरुन येणार्या वाटेवर येतो.
राहण्याची सोय : 
गडावर राहण्याची सोय नाही. तंबू ठोकून राहता येऊ शकते. पण वारा प्रचंड असतो. दुसरी सोय म्हणजे ओव्हरीची वस्ती. जेमतेम पाच-सात घरांची ही आदिवासी वस्ती असली तरी तेथील केंजळाई देवळात दहा-बारा जणांची रहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणच करावी.
पाण्याची सोय : गडावरील तळ्याचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते. कातळ पाय-यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते.
या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते. यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ -रायरेश्र्वर रस्ता ते केंजळगड - ३ तास.




किल्ले तळगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

रोह्याच्या आजुबाजुला अनेक डोंगररांगा पसरलेल्या आहेत.या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.या डोंगररांगावर अनेक किल्ले ठाण मांडून बसलेले आहेत.त्यापैंकी तळगड हा एक किल्ला.


इतिहास :
रोह्यापासून समुद्र अगदी जवळच आहे.कुंडलिका नदी जिथे सागराला मिळते तो सर्व भाग पूर्वी सागरी वाहतुकीसाठी वापरला जात असे.या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले त्यापैकी एक म्हणजे तळगङशिवरायांनी या सर्व परिसराचे महत्व जाणले होते म्हणूनच तळगड आणि घोसाळगड हे किल्ले आपल्या ताब्यात घेतले.पुढे राजा जयसिंगाशी झालेल्या पुरंधर किल्ल्याच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वतःकडे ठेवले.त्यामध्ये तळगड हा एक होता.यावरूनच या किल्ल्याचे महत्व आपणास समजते.पुढे १८१८ मध्ये जनरल प्राथरने हा किल्ला जिंकला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

किल्ला तसा लहानच त्यामुळे याचा घेरापण मोजकाच.किल्ल्याचे वैशिष्ट म्हणजे तटबंदी अजूनही शाबूत आहे.अनेक ठिकाणचे बुरुज आजही चांगल्या स्थितित आढळतात.किल्ल्यात शिरतांना पडझड झालेला दरवाजा लागतो तो म्हणजे हनुमान दरवाजा.या हनुमान दरवाजाच्या उजव्या कोप-यात मारुतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. गड हा दक्षिणोत्तर पसरलेला आहे.दरवाजातून आत गेल्यावर थोडाच अंतरावर पाण्याची खोदलेली सात टाकी आढळतात.पुढे दक्षिणेकडे चालत गेल्यावर बुरुज आहे.अनेक ठिकाणी घरांचे आणि वाडांचे अवशेष आढळतात. गडाचा वापर टेहळणी व्यतिरिक्त इतर फारसा होत नसल्याने फारशी शिबंदी गडावर नसावी.किल्ल्यावर घोसाळगड,महाड,रोह्याची खाडी असा सर्व परिसर दिसतो.गडाचा घेर आटोपशीर असल्याने अर्ध्या तासात किल्ला फिरुन होतो.

गडावर जाण्याच्या वाटा :

किल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट ही तळागावातूनच वर जाते.तळागावापर्यत जाण्यासाठी अनेक वाटा आहेत.गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे.या वाटेने गडावर जातांना पहिल्या टप्प्यावर एक छोटीशी सपाटी लागते.दुसरा टप्पा म्हणजे गडाच्या माचीचा भाग आणि तिसरा भाग म्हणजे किल्ल्याच्या अंर्तभागात असणारे प्रशस्त पठारच
होय.पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास पुरतो.
१. इंदापूरमार्गे

मुंबई-गोवा महामागार्वरुन महाडच्या अलिकडे इंदापूर गावाच्या नजीकच
तळागावाकडे
जाण्यासाठी फाटा फुटतो.येथून तळागावात जाण्यास ४५ मिनिटे लागतात.

२. रोहामार्गे

रोहृयाहून मुरुडकडे जातांना तांबडी नावाचे गाव लागते.येथून तळागावा
कके जाण्यास एक गाडीरस्ता आहे.

३. मांडादलेणी मार्गे

रोहा-मुरुड मार्गावर रोह्यापासून १५ किमी अंतरावर खाजणी फाटा
आहे.या फाटापासून ५ किमी अंतरावर कुडा गाव आहे.या कुडापासून १२
किमी अंतरावर तळागाव आहे.

राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही मात्र तळा गावात राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय : तळागावात हॉटेल्स आणि भोजनालये आहेत.
पाण्याची सोय : गडावर बारमही पिण्याच्या पाण्याचे तळे आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : तळा गावातून अर्धातास लागतो.

किल्ले गोरखगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगड आणि मच्छिद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या सुळक्यांमुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहे. गोरखगड आणि मच्छिद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील घनदाट अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे.
शहाजी राजांच्या काळात या गडाला महत्त्व होते. मात्र येथे कोणत्याही प्रकारच्या लढाईचा उल्लेख नाही. शिवकालात गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे.पूर्वी नाणेघाट मार्गेजुन्नरला जातांना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवा-याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे. गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणूनच याचे नाव 'गोरखगड'.



गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

दरवाज्यातून वर चढून गेल्यावर वर दोन तीन पाण्याची टाके लागतात. समोरची वाट पुन्हा
थोडयाश्या चढणीवर घेऊन जाते. पुढे पाय-यांच्या मदतीने थोडे खाली उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहचतो. समोरच प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच असणारा 'मच्छिद्रगड' निसर्गाच्या भव्य अदाकारिचे असीम दर्शन घडवतो. गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत. गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत पण त्यापैकी गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होतच नाही. गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणा-या वाटेने पुढे यावे.
थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात ५० पाय-या खोदलेल्या आहेत. ५० पाय-यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चालावे लागते. गडाचा माथा फारच लहान आहे.वर एक महादेवाचे मंदिर आहे आणि समोरच एक नंदी आहे. माथ्यावरून समोर मच्छिद्रगड, सिध्दगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघाट असा सर्व रमणीय परिसर न्याहाळता येतो.





गडावर जाण्याच्या वाटा :
गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याणमार्गेमुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गेमुरबाडला यावे. मुरबाडहून 'म्हसा' फाटया मार्गे'धसई' गावात यावे. येथून 'दहेरी' पर्यंत खाजगी जीप अथवा एस.टी. ची सेवा उपलब्ध आहे. दहेरी गावातून समोरच दोन सुळके दृष्टिक्षेपात येतात. लहान सुळका मच्छिद्रगडाचा तर मोठा सुळका गोरखगडाचा आहे. गावातील विठ्ठलाच्या मंदिरात मुक्काम करता येतो. मंदिराच्या मागच्या बाजूने जंगलात जाणारी पायवाट एक ते दीड तासात गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी घेऊन जाते. या वाटेने गड गाठण्यास दोन तास पुरतात.
:-मुरबाड - मिल्हे मार्गाने दहेरी गावी यावे. या गावातून अतिशय सोप्या वाटेने गडावर जाता येते.
-गोरखगडावर येण्यासाठी सिध्दगडावरूनही एक वाट आहे. अनेक ट्रेकर्स सिध्दगड ते गोरखगड असा ट्रेक करतांना या वाटेचा उपयोग करतात. या वाटेवर एक घनदाट जंगल लागते. सिध्दगडावर जाण्यासाठी मुरबाड - नारिवली मार्गाने यावे. नारिवली हे पायथ्याचे गाव आहे. सिध्दगडावर एक रात्र मुक्काम करून पहाटेच सिध्दगड उतरावा. वाटेत असलेल्या ओढाबरोबर एक वाट जंगलात शिरते. या वाटेने थोडे उजवीकडे गेल्यावर आपण धबधब्याच्या वाटेला जाऊन मिळतो. या वाटेने वर आल्यावर आपण एका छोटयाश्या पठारावर येऊन पोहचतो. पठारावर महादेवाचं छोटे मंदिर आहे आणि दोन समाध्या देखील आहेत. येथून पुढे गेल्यावर लागणारी वाट ही उभ्या कातळातील असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. आपण कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. या मार्गाने गड गाठण्यास तीन तास पुरतात.


राहण्याची सोय : गडावर असलेल्या एका गुहेत २०-२५ जणांना आरामात राहता येते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतःच करावी.
पाण्याची सोय : गडावर बारमाही पाण्याची टाके आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ : दोन तास दहेरी मार्गे.

किल्ले चंदेरी

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


मुंबई-पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना एक डोंगररांग आहे. त्यातून आपला भलाथोरला माथा उंचावलेला एक प्रचंड सुळका दिसतो, त्याचे नाव चंदेरी. बदलापूर-वांगणी स्थानकादरम्यान बदलापूर-कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव आहे. येथूनच चंदेरीची वाट आहे. नाखिंड,चंदेरी,म्हसमाळ नवरी बोयी या डोंगररांगेतील एक व पनवेलच्या प्रभामंडळाचे मानकरी असणा-या कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन् मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणा-या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.



इतिहास :


खरे तर रायगड जिल्ह्याचे दुर्गभूषण शोभणारा हा किल्ला असूनही तसे नाव घेण्याजोगे इथ काही घडले नाही. किल्ल्यावरील गुहेच्या अलीकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्लेपणाची हीच काय ती खूण. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याणभिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला, तेव्हा त्यात हा गडही मराठांच्या ताब्यात आला असावा. अल्प विस्तार,पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव, मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय, अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून, एक लष्करी चौकी असावी असेच वाटते. काही जणांच्या मते ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला



गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गुहेत पूर्वी एक शिवलिंग व नंदी होता. शिवपिंडी भंगलेल्या अवस्थेत आहे. तर नंदीचे अपहरण झाले आहे. गुहेच्या अलीकडेच एक सुमधुर पाण्याचे टाके आहे. ऑक्टोबर शेवट पर्यंतच त्यात पाणी असते ८ ते १० जणांच्या मुक्कामासाठी गुहा उत्तम आहे. गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे. कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे. रुंदी जवळजवळ नाहीच. दरड कोसळल्यामुळे सुळक्याचा माथा गाठणे फारच कठीण झाले आहे. सुळक्यावरून उगवतीला
माथेरान पेब, र्बळची डोंगररांग दिसते. तर मावळतीला भीमाशंकरचे पठार ,सिध्दगड, गोरक्षगड, पेठचा किल्ले. दिसतात. गडाच्या पायथ्याचा परिसर पावसाळ्यात फारच रमणीय व विलोभनीय असतो. धबधब्याचा आस्वाद घ्यायला अनेक पर्यटक येथे येतात.

गडावर जाण्याच्या वाटा :

मुंबई-कर्जत लोहमार्गावरील 'वांगणी' या रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून लोहमार्गाच्या कडेकडेने (बदलापूरच्या दिशेस) जाणा-या वाटेने गोरेगाव गाठावे. मुख्य रस्त्यावरून डावीकडे जाणारी वाट (कधी सडक) चिंचोली या पायथ्याच्या गावी घेऊन जाते. बदलापूर स्थानकात उतरून चिंचोलीस साधारण पाऊण तासाची पायपीट करूनही पोहचता येते. (वांगणी स्थानकातून गोरेगाव पर्यंत जाण्यास भाडाची वहानेही मिळतात.) चिंचोली गावास उजवीकडे ठेऊन वर 
जाणा-या दोन वाटा आहेत.
एका लहानश्या टेकाडाच्या दोन बाजूंनी ह्या वाटा जातात. टेकडीच्या उजवीकडून जाणारी वाट दगडधोंडांमधून जाणारी खडकाळ आहे. तर टेकडीच्या डावीकडून जाणारी वाट घसरडया लाल मातीवरील झाडांझुडपांतून जाणारी आहे. ह्या दोन्हीही वाटा मध्यभागी असणा-या एका लहानशा पठारावर घेऊन जातात. तेथून दोन डोंगराना सामाईक असणारी, इंगजी 'त' अक्षराच्या आकाराची खाच दिसते. त्या दिशेने चालत राहावे. ह्या खाचेच्या उजवीकडचा डोंगर म्हसमाळचा तर डावीकडचा उंच सुळका असणारा डोंगर चंदेरी होय.
पठारावरून थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे काही ओहोळ लागतात. त्याच्याचवर धबधब्याचा मार्ग आहे. धबधब्याचे पात्र ओलांडून धबधब्याच्या डावीकडे 
असणा-या पाय वाटेने गड चढण्यास सुरवात करावी. साधारणतः तासाभराच्या चढणीनंतर आपण एका चिंचोळ्या माथ्यावर पोहोचतो. त्याच्या दोन्ही बाजूस दरी आहे. तेथून डावीकडे जाणारी वाट थेट गुहेपाशी घेऊन जाते. नवीनच गिर्यारोहण करणार्यांनी सोबत वाटाडा नेणे उत्तम.

राहण्याची सोय : गुहेत ८ ते १० जणांची.
जेवणाची सोय : स्वतःच करावी.
पाण्याची सोय : ऑक्टोबर शेवट पर्यंत (पावसावर अवलंबून आहे.) टाक्यात पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ : चिंचोली गावातून दीड तास.
सूचना : गडमाथा गाठण्यास अवघड असे प्रस्तरारोहण करणे आवश्यक आहे. 

किल्ले पेब (विकटगड )

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

पनवेलच्या ईशान्येला मुंबई पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन - चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या माणसांच्या गर्दीपासून मोकळीक हवी असल्यास निसर्गप्रेमींनी पेबचा किल्ला विसरू नये. एरवीदेखील एका दिवसाच्या ट्रेकसाठी 'पेब' सारखी जवळची आणि निसर्गरम्य जागा शोधून सापडणार नाही. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट ,वरील गुहेची रचना ,गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड 'गोरखगडाशी' साधर्म्य साधतो. मात्र त्यामानाने हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे.







इतिहास :

या किल्ल्याचे मूळ नाव पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पेबचा किल्ला चढताना वाटेत लागणारा धबधबा हे एक मोठे आकर्षण. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहे समोरून आपल्याला नवरा-नवरी,भटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याही ऋतूत जाता येते




.गडावर जाण्याच्या वाटा :

मध्य रेल्वेने कर्जतमार्गेनेरळ स्टेशनवर उतरल्यावर स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. पेबला जाण्यासाठी नेरळ स्टेशनला उतरावे आणि उजवीकडची वाट पकडावी.
डावीकडची वाट आपणास माथेरानला घेऊन जाते. डोंगराच्या दिशेने जाताना मैदान,पोल्ट्रीफार्म,अर्धवट घरांची बांधकामे या काही खुणा सांगता येतील. त्यानंतर समोर दिसणा-या इलेक्ट्रिकच्या मोठमोठा टॉवरच्या दिशेने मार्गक्रमण करावे. सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर आल्यावर तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळ आपल्याला तीन वाटा लागतात.
१) धबधब्याला लागून असलेली वाट.
२) मधून गेलेली मुख्य वाट.
३) टॉवर्सला लागून असलेली वाट.
या तीन वाटांपैकी मधली मुख्य वाट हीच किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेणारी खरी वाट आहे.पहिल्या वाटेने पुढे गेल्यास जंगल लागते. पण पुढे या वाटेने जाणे अशक्यच आहे. तिसरी वाट म्हणजे मानेला वळसा घालून घास घेण्यासारखा प्रकार होय. तसेच या वाटेला पनवेलकडे जाणारे फाटे फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. मधून जाणारी वाट पकडावी.
या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढावे. हीच वाट पुढे झ-याची होत असली तरी ही वाट न सोडता याच वाटेने खिंडीच्या दिशेने वाटचाल करावी. खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे.तेथून पुढे पांढरा दगड लागतो. पांढरा दगड चढण्यास अतिशय कठीण असून तो पार केल्यानंतर मात्र पुढे थोडाच अंतरावर गुहा लागते. प्रथमच जाणा-यांनी वाटाडया घेणे हितकारक आहे. किल्ला चढण्यास लागणारा वेळ दोन ते अडीच तास आहे. पेबवर जाण्यासाठी गिर्यारोहकांना आणखी एक वाट आहे. त्यासाठी माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटवर यावे. येथून सुमारे ६ तासात पेबच्या गुहेत पोहचता येते. गुहांच्या पायथ्याशी गरुड कोरला आहे.
राहण्याची सोय : किल्ल्यावर गुहेमध्ये स्वामी समर्थांचे शिष्यगण रहात असल्याने गुहेच्या बाहेर किंवा जवळच असलेल्या कपारीमध्ये १० जणांच्या रहाण्याची सोय होते. गुहेजवळच असलेली पाण्याची टाके हीच पिण्याच्या पाण्याची सोय.



जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : पाण्यासाठी टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : ३ तास नेरळ पासून

किल्ले न्हावीगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणा-या या सह्याद्रिच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगी-तुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत तर दुस-या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे या किल्ल्याला रतनगड असे देखील म्हणतात.
गडावर जाण्याच्या वाटेवर पिण्याच्या पाण्याची टाकी आणि देवीचे एक मंदिर लागते.गडावर जातांना आपल्याला पाय-या तर लागतात पण दरवाज्याचा मात्र मागमूसही नाही. किल्ल्याचा माथा तसा निमुळताच आहे.गडावर पाण्याची तीन ते चार टाकी आहेत.घरांचे काही अवशेष सापडतात.गडाचा सर्वोध माथा म्हणजे एक सुळकाच आहे. तो चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण आवश्यक आहे.गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो.गडावरुन मांगीतुंगी,
मुल्हेर,मोरागड,साल्हेर आणि हरगड हा परिसर दिसतो.



गडावर जाण्याच्या वाटा :

वडाखेल मार्गे
न्हावीगडावर जाण्यासाठी ताहाराबाद मार्गेमांगीतुंगी गाव गाठावे.मांगीतुंगी गावातून एक तासाच्या चालीने वडाखेल गावात यावे.वडाखेलपर्यंत डांबरी रस्ता नाही.त्यामुळे पायीच त्रेधातिरपीट करावी लागते. वडाखेलमधून पाताळवाडीकडे कूच करावे.पाताळवाडी हे पायथ्याचे गाव आहे. वडाखेल ते पाताळवाडी हे अंतर अर्ध्या तासाचे आहे.पाताळवाडीतून एक सरळ वाट किल्ल्याच्या पठारावर गेलेली आहे.या पठारावरुन दोन वाटा :फुटतात.
एक वाट समोर नाकाडावरुन वर चढते.ही वाट थोडी कठीण आहे. वाटेने वर चढताना सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. वाटेने वर चढल्यावर आपण पाय-यापाशी पोहोचतो.दुसरी वाट पठारावरुन डावीकडे वळसा घालून पाययापाशी जाते. या वाटेला पाण्याची दोन-तीन टाकी लागतात.गडावर जाणा-या पाय-या मात्र जपूनच चढाव्या लागतात. पाय-यावर माती साचल्याने घसरण्याची शक्यता फार आहे.पाताळवाडीपासून गडावर दीड तासात पोहोचता येते.


राहण्याची सोय : गडावर राहण्याची भोजनाची सोय नाही
पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : जाण्यासाठी लागणारा वेळ पाताळवाडी गावातून दीड तास.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : आक्टोंबर ते एप्रिल पर्यंत.

किल्ले पट्टागड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढ, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. अलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्यांची भटकंती फारच अवघड आहे तर औंढ, पट्टा, या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे. पट्ट ाकिल्ल्याचेच दुसरे नाव विश्रामगड असे देखील आहे.
इतिहास : पट्टागड शिवाजी महाराजांनी इ.स.१६७१ मध्ये जिकूंन घेतला.
पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक मोठे पठारच आहे. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, त्रिंबकगड हा सर्व परिसर नजरेत भरतो. या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे. 
शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि याचे नामकरण 'विश्रामगड' असे केले. जालानापूरची लूट केल्यानंतर शिवाजी महाराजांनी काही काळ या किल्ल्यावर घालवला. पुढे इ.स.१६८६ पर्यंत हा सर्व परिसर मराठांच्या ताब्यात होता. १६८२ साली औरंगजेबाने महाराष्ट्रात पदार्पण केले आणि मराठी मुलूख ताब्यात घेण्यास सुरवात केली.
१६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठांचे औंढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिंगलवाडी, मदनगड, मोरदंत किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्यांना जिंकून 
घेतला.



गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

: पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. औंढा किल्ल्याकडून येणा-या वाटेने किल्लावर पोहोचल्यावर (वाट२) समोरच पाण्याचे एक टाके लागते. पाण्याच्या टाक्यापासून दोन वाटा निघतात. एक डावीकडे तर दुसरी उजवीकडे.
उजवीकडच्या वाटेने पुढे गेल्यावर थोडाच अंतरावर पाण्याचे टाके आहे. उजवीकडच्या माथ्यावर आता काहीच शिल्लक नाही म्हणून आता डावीकडच्या माथ्यावर वळावे. पाऊण तास पुढे गेल्यावर दोन पाण्याची टाकी आढळतात. समोरच एक मोठी इमारत आहे.
इमारतीच्या भिंती आणि छप्पर अजूनही शिल्लक आहे. समोरच किल्ल्याची आडवी तटबंदी आहे. तटबंदीच्या वरच्या भागावर दोन मोठा गुहा आहेत. समोरच सात पाण्याची टाकी आहेत. गुहा रहाण्यासाठी उत्तम आहेत. तटबंदीच्या खालच्या बाजूला गेल्यावर अष्टभुजा देवीचे मंदिर लागते. या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्वार केला आहे. मंदिराच्या समोरच उत्तरमुखी दरवाजा दिसतो. त्याची कमान आजही शाबूत आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला बुरूज आहे. मंदिर आणि बुरुजाच्या खालच्या बाजूस उतरलं की दोन गुहा लागतात. एका गुहेमध्ये साधूचे वास्तव्य आहे
तर दुस-या गुहेत अलीकडेच गावाचा दवाखाना आहे. येथून खाली जाणारी वाट पट्टावाडीत जाते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास ४ तास पुरतात.

गडावर जाण्याच्या वाटा :
इगतपुरी - घोटी मार्गेटाकेद : इगतपुरी - घोटी मार्गेटाकेद गाव गाठावे. टाकेद पर्यंत पोहचण्यास १ तास लागतो. टाकेद वरून कोकणवाडी या वाडी पर्यंत जीपसेवा उपलब्ध आहे. टाकेद ते कोकणवाडी हे अंतर पाऊण तासाचे आहे. कोकणवाडीला येण्यासाठी दुसरी वाट एकदरा गावातून सुद्धा जाते. टाकेदच्या पुढेच हे एकदरा गाव आहे. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अर्ध्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. पट्टावाडी हे गाव मुळातच डोंगराच्या पठारावर बसलेले आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. गावातून किल्ल्याचा माथा गाठण्यास अर्धा तास पुरतो.
इगतपुरी-भगूर बसने कडवा कॉलनी : दुसरी वाट औंढ किल्ल्याकडून येते. इगतपुरी-भगूर बसने कडवा कॉलनी गाठावी. कडवा कॉलनी पासून निनावी गावात यावे. निनावी गावात औंढ किल्ल्याची डोंगसोंड खाली उतरलेली आहे. यावरून वर चढून गेल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठारावरून उजवीकडची वाट पकडावी. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर आपण औंढाच्या पायथ्याशी पोहोचतो. या किल्ल्याच्या पायथ्याशी वाट दुभागते. उजवीकडची वाट औंढ किल्ल्यावर जाते तर, सरळवाट पट्टा किल्ल्याकडे जाते. या वाटेने पुढे गेल्यावर एक खिंड लागते. या खिंडीतून पुढे गेल्यावर समोरच पठार लागते. पठारावर देवीचे एक मंदिर आहे. मंदिराच्या मागून जाणारी वाट पुढे दुभागते.डावीकडची वाट पट्टावाडीत जाते तर सरळ डोंगरसोंडेवर चढणारी वाट वीस मिनिटात एका कातळकडा पर्यंत पोहचते. कातळकडाच्या डावीकडची वाट कडाला चिकटूनच पुढे जाते. सुमारे २० मिनिटांत आपण दोन डोंगराच्या मध्ये जाते. समोरच पट्टाची तटबंदी आहे. वाटेतच एक पाण्याचे टाके लागते.


राहण्याची सोय :

- किल्ल्यावर दोन मोठा गुहा आहेत. गुहेमध्ये ५० जणांची राहण्याची सोय होते.
- पट्टावाडीत सुद्धा राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ : पट्टावाडीतून अर्धा तास लागतो.

किल्ले प्रबळगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी

मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन जातांना दिसणारा हा नावाप्रमाणे बलवान असणारा एक दुर्ग चटकन आपले लक्ष वेधून घेतो. पूर्वेला उल्हास
नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला, तसेच जवळच असलेला इर्शाळगड
असा चहूबाजूंनी वेढलेला हा किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड.


इतिहास : 

उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्य निर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले मुरंजन.बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजियाच्या सिद्दिकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : 


प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेशमंदिर आहे. तसेच दोन तीन पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी वाटाडा घेणे आवश्यक आहे. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडाचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे तो विचार मागे पडला. गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत. मात्र गडावरून माथेरानचे विविध पाँईंटस् फार सुंदर दिसतात.






गडावर जाण्याच्या वाटा :

शेडुंग मार्गे- : मुंबईहून किंवा पुण्याहून येणा-यांनी पनवेल गाठावे. पनवेल पुणे हमरस्त्यावर शेडुंग गावाकडे जाणारा फाटा आहे. एस्.टी चालकांना सांगून शेडुंग फाटावर उतरावे. हमरस्त्यावरून जाणारी वाट पकडावी. अर्ध्या तासाच्या रस्त्यावर शेडुंग गाव लागते. शेडुंग गावापासून ठाकुरवाडीपर्यंत चालत यावे. अंतर ५ कि.मी. ठाकुरवाडी हे गडाच्या पायथ्याचे गावगावातून बैलगाडीची वाट थेट आपल्याला प्रबळमाचीवर घेऊन जाते.प्रबळमाचीवर जाण्यास दीड तास लागतो. प्रबळमाची गावातून समोरच एक घळ दिसते. या घळीतून गडावर जाण्यास एक तास पुरतो.ठाकूरवाडी / अेिश्रे पर्यंत जाण्यास पनवेलहूनही बसेस आहेत.

पोईंज मार्गेः-पनवेल चौक मार्गावर शेडुंगच्या पुढे पोईंज फाटा आहे. तिथे उतरून पोईंज गावात पोहचावे. येथे समोरच असणा-या डोंगर सोंडेवरून प्रबळमाची या गावात जावे. येथून दीड ते दोन तासात प्रबळगड गाठावा.माथेरान ते प्रबळगड :- माथेरान जवळील शार्लोट जलाशयाजवळील श्री पिसरनाथ मंदिराजवळून डावीकडे वळल्यावर दहा मिनिटात आपण एका घळीत येऊन पोहोचतो. लोखंडी शिडांच्या सहाय्याने दोन तासात आकसर वाडी या गावात पोहोचता येते. आकसर वाडीतून प्रबळगडचा डोंगर चढत काल्या बुरूजाखाली असलेल्या पठारावरून घळीतून वर चढत गडमाथा गाठावा.





राहण्याची सोय : 
गडावर रहाण्याची सोय नाही. शेडुंग गावातील शाळेच्या कट्ट्यावर
 २५ - ३० माणसांची झोपण्याची सोय होऊ
शकते.

जेवणाची सोय :
आपणच करावी

पाण्याची सोय :
बारमाही पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत
.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
३ ते ४ तास पायथ्यापासून

Monday, February 21, 2011

किल्ले भुदरगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

कोल्हापूर पासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.

आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिध्द आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली आहे. इथे दरवर्षी माघ कॄष्ण १ पासून १० पर्यंत मोठी यात्रा भरते.


इतिहास

इ.स. १६६७ मधे शिवाजी महाराजांनी भूदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मोगलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भूदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच, पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देउन टाकली ती अजूनही देवळात आहेत.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करुन त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला.

इ.स. १८४४ मध्ये कोल्हापूरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भूदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. १३ ऑक्टोबर १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भूदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला.
असे बंडाचे प्रयत्त्न वारंवार होऊ नयेत म्हणून तेथील तटबंदीची बरीच पाडापाड केली.









गडावरील ठिकाणे

गडावरील सर्वात सुस्थितीतील व प्रे़क्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचे मंदिर. गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे. हिलाच जखुबाई म्हणून ओळखतात.
गडावर थोडीशी झाडी आहे. गडावरुन दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य व आंबोली घाटाचा परिसर दृष्टीस पडतो.






कसे जाल

कोल्हापूर पासून - गारगोटी पर्यंत बस आहे. नंतर गारगोटी पासून किल्ल्याच्या तटाखालपर्यंत एस टी महामंड्ळाची सोय आहे.

किल्ले बहिरी - गडदचा बहिरी

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

लोणावळ्याच्या उत्तरेला दहा मैलांवर असलेल्या राजमाची किल्ल्यावर वर्षभर दुर्गप्रेमी येत असतात. मात्र याच राजमाचीजवळ निबीड अरण्यात असलेल्या बुलंद आणि बेलाग अशा ढाकच्या किल्ल्याची फारशी कोणाला ओळख नाही. या किल्ल्याची आपल्या सारख्या रानावनात हिंडणा-या मंडळीना ओळख करून दिली ती म्हणजे 'गो. नी. दांडेकर' यांनी. ढाकचा बहिरी म्हणजे 'ढाकचा किल्ला' आणि 'गडदचा बहिरी'.
ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणा-या सुळक्याला 'कळकरायचा सुळका' असेही म्हणतात. विशेषतः ढाकच्या किल्ल्यावर पोहचायचे असल्यास 'वदप' गाव गाठावे. किल्ल्याच्या माथ्यावर पाण्याची दोन, तीन टाकी आणि एक मंदिर आहे. मंदिरात ४ जणांना झोपता येते. या किल्ल्याच्याच नैसर्गिक तटबंदीच्या कातळात 'गडदचा बहिरी' लपून बसला आहे. याच्या पश्चिमेला पळसदरी तलाव, पूर्वेला उल्हास नदीचे खोरे आहे.









गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
बहिरीची गुहा - या बहिरीच्या गुहेतच पाण्याचे एक मोठे टाके आहे. या टाक्यांमध्येच गावक-यांनी जेवणासाठी काही भांडी ठेवली आहेत. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवावी. गुहेच्या वरच दीड हजार फूटांची कातळभिंत आहे. गुहेच्या समोरच
राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो.





गडावर जाण्याच्या वाटा :

गडदचा बहिरीवर अर्थात ढाकच्या गुहेपर्यंत जाणा-या सर्व वाटा 'कळकरायचा सुळका' आणि बहिरीचा डोंगर यामधूनच जातात.

राहण्याची सोय :
येथील राहण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बहिरीची गुहा हेच होय.

जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वतःच करावी.

पाण्याची सोय :
गुहेतच पिण्याच्या पाण्याचे एक मोठे टाके आहे. वाटेत कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने उन्हाळ्यात पाण्याचा भरपूर साठा असणे आवश्यक.


जाण्यासाठी लागणारा वेळ :
४ तास सांडशी मार्गे.

किल्ले भैरवगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

भैरवगड हा कोयनानगरच्या विभागात मोडणारा किल्ला आहे. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट म्हणजे सर्व किल्ले घाटमाथ्याच्या सलग रांगेपासून दुरावलेले आहेत. त्यामुळे दुरून हे किल्ले दिसत नाही. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण. हे अरण्य अभयारण्य म्हणून धोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर बसवण्यात आली आहेत. त्यामुळे माणसांचा वावर तसा कमीच. पायथ्याची गावं गाठण्यासाठी एस. टी. ची चांगली सोय आहे.




इतिहास :

इतिहासात या गडाचा उल्लेख कोठेही आढळत नाही. मात्र या गडाचा वापर केवळ टेहळणी साठी असावा असे येथील बांधकामावरून दिसते. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : भैरवगडावर पाहण्यासारखे फार काहीच नाही. गडावर एक मंदिर आहे. मंदिर फारच प्रशस्त आहे. मंदिर मजबूत आणि कौलांनी शाकारलेले आहे. मंदिरात भेरी देवी, श्री तुळा देवी, श्री वाघजाई देवी यांच्या २-३ फुटी मूर्ती आहेत. या लाकडी मंदिरावर बरेसचे कोरीव काम आढळते. मंदिरासमोरच्या प्राकारात तुळशीवृंदावन, शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो. तसेच समोर दोन तीन खांब देखील दिसतात. समोरच शंकराचे मंदिर सुद्धा आहे. मंदिरासमोरच खाली उतरणार्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तीन बुरूज लागतात. येथून थोडे पुढे गेल्यावर एक ढासळलेल्या अवस्थेतील दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर डावीकडे वळावे. समोर असणार्या टेकाडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस यावे. येथे पाण्याची दोन टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही टिकते. याच्यापुढे पाहण्यासारखे काहीच नाही. लांबवर पसरलेलं कोयनेचं दाट जंगल दिसते. गडमाथा तसा अरुंदच आहे. त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. मंदिराच्या दिशेने तोंड करून उभे राहिल्यास उजवीकडे दरीत उतरणार्या वाटेने ५ मिनिटे खाली उतरावे. येथे सुद्धा पाण्याचं एक टाकं आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते.






गडावर जाण्याच्या वाटा :
भैरवगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. एक थेट कोकणातून वर चढते तर दुसरी हेळवाकच्या रामघळीत पासून गडावर जाते. तिसरी गव्हारे गावातून आहे.
१. दुर्गवाडी मार्गेः या मार्गेभैरवगडावर येण्यासाठी प्रथम चिपळूण गाठावे. चिपळूण वरून दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे. चिपळूण ते दुर्गवाडी अशी ८:०० वाजताची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणतः १ तास लागतो. दुर्गवाडी गावाच्या वर असणार्या जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे. गव्हारे गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही.


२. हेळवाकची रामघळ मार्गेः हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण - कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर हेळवाक नावाचा फाटा लागतो. तेथे उतरून २ तासांत रामघळ गाठावी. रामघळीतूनच वर जाणारा रस्ता पकडावा. पाथरपुंज जुना वाघोना मार्गावरून आपण भैरवगडावर जाऊ शकतो. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास ६ तास लागतात. वाटेत खूप घनदाट जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे असल्यास वाटाडया घेऊन जाणे आवश्यक आहे.


३. गव्हारे मार्गेः गडावर जाण्यासाठी गव्हारे गावातूनही वाट आहे. दुर्गवाडी गावाच्या अगोदर गव्हारे गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. या गाडीरस्त्याने गव्हारे गावात पोहचावे. गावातून गडावर जाण्यास तीन तास पुरतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणार्या वाटेस मिळते.






राहण्याची सोय : गडावरील मंदिरात २० जणांना राहता येते.

जेवणाची सोय :आपण स्वतः करावी.

पाण्याची सोय : बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : ३ तास - दुर्गवाडी मार्गे. ७ तास - रामघळी मार्गे
.सूचना : पावसाळ्यात जळवांचा त्रास फार मोठा प्रमाणात होतो. यापासून बचाव करण्यासाठी मीठ सोबत घेऊन जाणे.

किल्ले मदनगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

सह्याद्री मधील कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड. किल्ला तसा बराच प्राचीन आहे आणि तेवढाच दुर्गम सुद्धा. या परिसरातील भटकंती करायाची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी.



गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :


गडमाथा तसा लहानच आहे.गडावर पाण्याची दोन टाकी आहेत मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते.गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा सुद्धा आहे.गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसतो. अलंग,कुलंग ,छोटा कुलंग रतनगड,आजोबा गड,कात्राबाई ,डांग्या सुळका ,हरिहर,त्रिबंकगड हे कि दिसतात. गडफेरीस अर्धातास पुरतो.







गडावर जाण्याच्या वाटा : गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात.आंबेवाडी मार्गेः मदनगडावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे. इगतपुरी/कसारा - घोटी - पिंपळनेरमोर या मार्गेआंबेवाडी गाठावी.घोटी ते आंबेवाडी अशी एस टी सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ कि.मी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६.०० वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग,मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदन च्या खिडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फार दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून मदन वर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. उजवीकडे वळल्यावर थोडाच वेळात पाय-या लागतात. पाय-या चढून गेल्यावर एक सरळसोट ५०फूट उंचीचा कडा लागतो







घोटी - भंडारदरा मार्गेघाटघर : किल्ल्यावर येण्यासाठी दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी - भंडारदरा मार्गेघाटघर गाठावे.घाटघरहून चार तासात आपण अलंग आणि मदन यांच्या खिंडीपाशी पोहचतो.

राहण्याची सोय : गडावर एक गुहा आहे यात साधारण ३० जण राहू शकतात.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर फक्त फेब्रुवारी पर्यंत पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ : आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात
.सूचना : किल्ल्यावर जाण्याची वाट अतिकठीण असल्यामुळे प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.

किल्ले मलंगगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. बदलापूरच्या नैऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा व उरण नैऋत्येस आणि बोरघाट,भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.



इतिहास :

ऍबिंग्डन ह्या इंग्रजी अधिकार्याने १७८० मध्ये मंलगगडाला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात. हे लक्षात घेऊन बेसावध 
मराठ्यांवर भर पावसातच हल्ला करण्याचे त्याने ठरवले. लढाई सुरू होताच नैऋत्य व उत्तरेकडच्या वाटा बंद करून टाकल्या. त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले. तेथे पांडुरंग केतकर यास ३०० माणसांनिशी नेमलेले हाते. अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार केला नाही. १२५ जण सोने माचीकडे धावले. तर बाकी गडावर जागा नव्हती म्हणून कल्याणच्या मामलेदाराकडे धावले. ऍबिंग्डनने गडावर पोहचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून पीर माचीपर्यंत वाट शोधून काढली. नाना फडणविसाने वेढा उठवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. ऍबिंग्डनने पीर माचीच्या पठारावर तीन तोफा चढवल्या व सोने माचीवर गोळीबार चालू केला. पण प्रवेशद्वार मोठा खुबीने बांधले असल्यामुळे तेथवर गोळे पोहचेनात. मराठांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहीत असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभव नव्हता.
किल्लेदाराने आनंदराव धुळप व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली पण त्यांनी प्रत्यक्ष न येता ७०० शिपाई पाठवले जे तेथवर पोहचू शकले नाहीत. कॅप्टन ऍबिंग्डनने शिडा लावून २५० माणसे सोने माचीवर चढवली. पण मराठानी गडावरून दगडधोंडांचा वर्षाव करून त्यांना परत पाठवले. ऍबिग्डनने पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. गंगाधररावानने संधी साधून दाणापाणी व दारूगोळा भरून धेतला
. नाना फडणीसांनी बाळाजी विश्र्वनाथ पाठक व राधोविश्र्वनाथ गोडबोले यांना सैन्य देऊन वेढा उठवण्यास पाठवले. त्यांच्या फौजा शिरवळ या मलंगच्या उत्तरेला असलेल्या गावी पोहचल्या. 
मराठ्यांचीफौज तीन हजारावर होती. त्यांनी शत्रूला हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले. पण ते अयशस्वी झाले. १६ सप्टेंबरला गारांची एक पलटण पीर माचीवर चाल करून गेली. त्यांनी तोफांवर हल्ले केल्यामुळे ब्रिटिशांनी घाईघाईने तोफा काढून घेतल्या. मेजर वेस्टफॉलने ऍबिंग्डनच्या मदतीसाठी जादा कुमक धाडली. या सेनेने रसद घेऊन येणार्या मराठ्यांच्या तुकडीला उध्वस्त केले. त्यामुळे मलंगगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. काही धान्य पावसाने नासले, खजिना संपत आला.मराठ्यांनीइंग्रजांचेही दळणवळण तोडून टाकले होते. तेंव्हा कर्नल हार्टलेने बेलापूर,पनवेल,तळोजे मार्ग सुरक्षित केला.
शिरवळच्या मराठ्यांच्या 
तळावर हल्ला करून त्यांना हुसकावून लावले. आता ब्रिटिशांनी कॅप्टन कारपेंटरच्या हुकमतीत मलंगगडावर दुसरा हल्ला चढवला. तोफांचा गोळीबार सुरू केला. तटाला भगदाड पडले की आत घुसायला ३५० सैनिक तयार ठेवले होते पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवेला.इंग्रजांचे बरेच सैनिक कामी आले. तेंव्हा इंग्रजांनी हल्ले थांबवले. पण वेढा मात्र उठवला नाही.पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार केली.
त्यांना शरण यायला लावावे असे इंग्रजांनी ठरवले. ऑक्टोबर नंतर किल्ल्यावर उपासमार होऊ लागली. बाहेरून गंगाधर कार्लेकर काही मदत पाठवू शकले नाहीत. शेवटी नाना फडणविसाने काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगगड व वसई वर धाडली. स्वतः नाना व हरीपंत फडके दहा हजार फौजेसह खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे जायचे ठरवले. त्यामुळे हार्टलेला प्रतिशह दिला जाणार होता. ताबडतोब हार्टलेने मलंगगडावरून सैन्य काढून घेतले व लगेसच मराठांनी मलंगगडाकडे जादा कुमक व रसद धाडली अशाप्रकारे 
मराठ्यांनी अखेरपर्यंत मलंगगड शर्थीने लढवला.





गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
माचीवरून सरळ पुढे जात पलीकडचे टोक गाठायच. तेथून एका चोर वाटेने खाली उतरले की गडाच्या निम्म्या उंचीवर एक आश्रम लागतो. तिथून गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाच्या दिशेने वळसा घेत जाणा-या वाटा निघतात. पहिली वाट खाली वावंजे गावात जाते. तेथून पनवेलला जायला एस टी मिळते. उत्तर दिशेच्या वाटेने गेले की दोन वाटा फुटतात. सरळ जाणारी वाट गडाला वळसा घालून पालखीसारख्या आकाराच्या खडकाखालून किल्ल्यावर जाते. उजवीकडे खाली उतरणारी वाट मलंगगड व गणेश कार्तिक सुळक्यांचा डोंगर यांच्यामधील खिंडीत पोहचते. माचीवरून बालेकिल्याकडे जाण्यासाठी कडाला उजवीकडे ठेवत वळसा घालून गेले की खोदीव पाय-या दिसतात. पाय-यापुढे एक गुहा व पाण्याचे टाके आहे. येथून पुढे जाणे कठीण आहे. पन्नास साठ पाय-यां नंतरच्या पाय-या तुटलेल्या आहेत. तो भाग चढण्यासाठी दहा बारा फूटांचा एक पाइप आडवा टाकलेला आहे आणि हातांच्या आधारासाठी दोर लावला आहे. हा अवघड टप्पा पार करून दहा मिनिटांत गड माथ्यावर पोहचता येते.
शिरोभाग तसा लहान आहे. छप्पर उडालेले पण भिंती शाबूत असलेला एक वाडा दिसतो. त्याच्या मागे खोदलेली सात टाकी आहेत. बालेकिल्याच्या मध्यभागी औदुंबराच झाड आहे. आणि काही ठिकाणी तटबंदीही आहे. बालेकिल्याच्या समोरच देवणीचा सुळका आहे. येथे येणारे भाविक या समोरच्या देवणीवर एक दगड फेकून मारण्याचा सोपस्कार करतात. दगड जर देवणीवर पोहोचला तर मनातली गोष्ट साध्य होते असे म्हणतात.
पूर्वेकडून नैऋत्येकडे गोरखगड,राजमाची,माथेरान,पेब,इर्शाळ,प्रबळ वगैरे हा परिसर दिसतात.गडावर







जाण्याच्या वाटा :

कल्याणहून सकाळी अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिध्द हाजीमलंग दर्गा आहे. तिथपर्यंत पाय-या आहेत.वाटेत दुकाने आहेत. एक देवीचं मोठे मंदिर आणि शंकराच लहान देऊळ आहे. वरच्या या दर्ग्यापर्यंत भविकांची भरपूर वर्दळ असते.दर्ग्याच्या अलीकडे दुकानांच्या रांगेतून एक बोळ उजवीकडे जातो. तेथे घरे आहेत आणि विहीरही आहे. वाट समोरच्या डोंगराला लागून उजवीकडून वर चढायला लागते. पधंरा वीस मिनिटांत पहिला चढ पार करून वरच्या उभ्या कडयापाशी पोहचता येते.

राहण्याची सोय : नाही
जेवणाची सोय : नाही
पाण्याची सोय : गडावर अनेक टिकाणी पाण्याची टाकी आहेत. यातील पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते.
जाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्यापासून २ तास.

किल्ले माणिकगङ

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


मुंबई पुणे हमरस्त्यावरुन जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात.प्रबळगड,इरशाळ,चंदेरी,माथेरान,कर्नाळा,लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे त्याचे नावं माणिकगङ. कर्नाळा,सांकशी,माणिकगड हे या रांगेतील तीन भाऊ.माणिकगडाच्या आजुबाजुचा सर्व प्रदेश सधन असला तरी येथील लोकांचे राहणीमान मात्र साधेच आहे.शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय.



गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे


किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे. तटबंदीमधन आत शिरल्यावर समोरच देऊळ दिसते आणि पुढे दोन कोठा दिसतात.कोठांची दारे अजूनही शाबूत आहेत. तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी पाय-या आहेत.येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात.त्याच्या समोरच जोत्याचे अवशेष दिसतात.येथून डावीकडे फुटणा-या वाटेने पुढे गेल्यावर आणखी ४ टाक्या दिसतात यात मेंपर्यंत पाणी असते.टाक्यांच्या समोरच शंकराची पिंड आहे.पुढे गेल्यावर दोन चांगले बाधलेले बुरुज आढळतात.येथून पुन्हा गड जिथून पाहयाला सुरवात केल त्या जागेपाशी येऊन पोहचतो.किल्ल्यावरूनप्रबळगड,इरशाळगड,कर्नाळा आणि सांकशीच किल्ला हा परिसर दिसतो.संपूर्ण गडफेरीस अर्धा तास पुरतो.





गडावर जाण्याच्या वाटा : पनवेल किंवा खोपोली मार्गेयायचे झाल्यास आपटे फाटामार्गेरसायनीकडे वळावे.रसायनीमधून वाशिवली गावात यावे.वाशिवली गावातून वडगाव गावात यावे.वडगाव किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.पनवेलहून वडगाव पर्यंत येण्यास दीड तास पुरतो.वडगाव हे ब-यापैकी मोठे गाव आहे.माणिकगडाची एक सोंड गावातच उतरलेली आहे.या सोडेच्या साह्याने समोरच्या डोंगरधारेवर चढत जावे.वडगाव पासून डोंगराच्या माथ्यावर जाण्यास अर्धा तास पुरतो.या डोगराच्या माथ्याचर कातरवाडी वसलेली आहे.या वाडीतून गड समोरच दिसतो.गडाच्या दिशेने चालत निघायावर अर्ध्यातासातच आपण एका जंगलात शिरतो.येथून पुढे जाण्यासाठी दोन वाटा फुटतात.


१. माणिकची लिंगी मार्गे उजवीकडे जाणारी वाट प्रशस्त आणि मळलेली आहे.या वाटेने जातांना गड डावीकडे ठेवून आपण पुढे जातो.वाट जंगलातून पुढे गेलेली आहे.सुमारे अर्ध्या तासाने आपण गडाच्या पश्चिम टोकावर पोहचतो.येथेच गडाला चिटकून एक सूळका आहे.यालाच 'माणिकची लिंगी' म्हणतात.येथून एक वाट सरळ पुढे
पठारावर गेलेली आहे तर दुसरी वाट डावीकडे जंगलात वर चढत गेलेली आहे.ही वाट किल्ला आणि सुळका यांच्या बेचक्यातून वर जाते.हीच वाट आपण पकडायची.या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक घळ लागते.या घळीतून वर चढून जायचे पण वाट जरा दमछाक करणारी आहे.या वाटेने किल्ल्यावर पोहचण्यास एक तास लागतो.

२. खिंडीतुन उजवीकडच्या वाटेचा नाद सोडून ायचा आणि समोर असणा-या झाडीत शिरायचे.या वाटेने आपण समोरची डोंगरसोंड चढत जातो.पुढे दोन उंचवटे पार केले की आपण एका खिंडीत पोहचतो.येथेच एक छोटासा सुळका आहे. सुळका आणि डोंगर यांच्या खिंडीतून वर चढले की आपण पुन्हा एका घळीत पोहचतो.या घळीतून सोपे प्रस्तरारोहण करून वर चढले की आपण एका पठारावर येऊन पोहचतो आणि या पठारावर क्रं १ ची वाट आपल्या वाटेला येऊन मिळते.या दोन्ही वाटा एकत्र येऊन पुढे एक वाट तयार होते आणि आपण किल्ल्यात प्रवेश करतो.





राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी
पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : वडगावमार्गे३ तास. 

किल्ले संतोषगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात.

सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे.शंभूमहादेव रांग ,बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड,वारुगड,महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत.हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र ऊसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे.सर्व ठिकाणी वीज ,दूरध्वनी अशा आधुनिक सुविधा सुध्दा उपलब्ध आहेत.फलटण च्या माण तालुक्यात असणा-या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस पुरतात.

कसे जाल?

किल्ल्यावर जाण्यासाठी फलटण आणि सातारा दोन्ही शहरातून जाता येते.ताथवडे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.ताथवडेला अनेक मार्गांनी पोहचता येते.फलटण ते ताथवडे अशी एस टी सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध आहे.फलटण ते ताथवडे हे साधारण १९ कि.मी चे अंतर आहे.

सातार्याहून पुसेगाव मोळघाटमार्गे फलटणला जाणार्या बसने ताथवडे ला उतरता येते.पुसेगाव ते ताथवडे हे साधारण २३ कि.मी चे अंतर आहे.ताथवडे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित वाट आहे.या वाटेने किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो.




रचना
गड हा तीन भागात विभागला आहे.पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुस-या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्लाचा भाग आहे.


उपयोग

किल्ला सा छोटासाच आहे पण तटबंदी ,बुरूज असे पाहण्यासाखे बरेच काही आहे.गडावरून फार दूरच्या प्रदेशावर नजर ठेवता येत असे.पश्चिमेस मोळघाट,दक्षिणपूर्व पसरलेली डोंगररांग याच डोंगररांगेवर सीताबाईचा डोंगर व वारुगड आहे.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

ताथवडे गावात "बालसिध्दचे जीर्णोध्दार' केलेले मंदिर आहे.मंदिराच्या पायरीवरून सन १७६२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोध्दार केल्याचे समजते. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एक मठ आहे.या मठाच्याच बाजूला एक गुहा आहे.या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे.एक वाल्मिकी ऋषिंची मूर्ती आहे.मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे मात्र येथपर्यंत पोहचण्यासाठी वळसा घालून यावे लागते.मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते.पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते.येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यातच घेऊन जाते.आज किल्ल्याचा दरवाजा मात्र केवळ नाममात्रच शिल्लक राहिलेला आहे.दरवाज्यामधील पहारेक-यांचा देवड्या आजही सुस्थितित आहेत.दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच हनूमानाचे टाके आहे.त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत.धान्य कोठारांच्या भिंति उभ्या आहेत पण छप्पर उडालेले आहे.याच्याच मागच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे.लांबवरून पाहिल्यास एखादी विहीरच वाटते मा त्र जवळ गेल्यावर समजते की खाली पाण्याचं टाकं आहे आणि टाक्यात उतरण्यासाठी चक्क कातळभिंतिला भोक पाडून पाय-या केलेल्या आहेत. किल्ल्याची पहिल्या टप्प्यावर असणारी संरक्षक तटबंदी , बुरुज आजही चांगल्या परिस्थित उभे आहेत.आजमितिस अनेक किल्ल्यांची तटबंदी ढासळलेल्या आढळतात पण संतोषगड याला अपवाद आहे.

महत्व

विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारुगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडांवरील पाणीसाठा गावकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे.

किल्ल्याचा संपूर्ण परिसर भटकण्यास दोन तास पुरतात.

किल्ले माहुली

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड.


इतिहास :

इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्याची मूळ उभारणी कोणी केली, हे ज्ञात नाही. पण १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजाम शाहीच्या संस्थापक असलेल्या मलिक अहमद याच्याकडे आले. पुढे शहाजीराजे निजामशाहीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मोगल फौजा व आदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाही बुडवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. १६३५-३६ च्या सुमारास शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर - शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमान म्हणजे महाबतखानाच्या मुलाने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली. पण त्यांनी नकार दिला असता शहाजींनी शरणागती पत्करली. पुढे १६५८ मध्ये ८ जानेवारी रोजी शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला. पण १६६१ मध्ये तो मोगलांना परत ावा लागला.
लगेसच तो परत जिंकून घेतला गेला. १६६५ च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले. त्यानंतर मोगलांचा मनोहरदास गौड हा धोरणी कर्तबदार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले. फेब्रुवारी १६७० मध्ये खुद्द शिवाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली माहुलीवर केलेला हल्ला अयशस्वी ठरला. दीड हजार मराठी मावळ्यांपैकी तब्बल हजार मावळे मोगलांनी कापून काढले. मराठांचा दणदणीत पराभव झाला. या यशानंतरही मनोहरदास गौडने किल्लेदारी सोडली. त्याच्या जागी अलाविर्दी बेग हा नवा किल्लेदार रुजू झाला. नंतर १६ जून १६७० रोजी दोन महिन्यांच्या वेढा नंतर दोनशे मोगल सैनिकांचे रक्त सांडले. मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली, पळसगड व भंडारगड हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले.





गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
आसनगावमार्गेमाहुली गावातून शिडीच्या वाटेने किल्ल्यावर आल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. पाच मिनिटांवर आणखी एक पाण्याचे टाके आहे. उजवीकडे गेल्यावर खाली पहारेकर्यांच्या देवडा आहेत. समोरच ढासळलेल्या अवस्थेतला महादरवाजा आहे. इथून भातसा राशी, अलंग, मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांग दिसते. तर पूर्वेला हरिश्चंद्रगड, आजोबा, दक्षिणपूर्वेला माथेरान रांग, दक्षिणपश्चिमेला तानसा खोरे, तुंगारेश्र्वर रांग असलेला प्रचंड मुलूख दिसतो.शिडीच्या
वाटेने दोन मिनिटे पुढे गेल्यावर डावीकडे जंगलात एक वाट जाते. वाटेतच छप्परवजा असणारे महादेवाचे मंदिर आहे. पुढे वाडाचे काही अवशेष आढळतात. समोरच पाण्याचा फार मोठा तलाव आहे. पुढे गेल्यावर जांभळाचे रान लागते. ही वाट खिंडीत जाऊन पोहोचते. ही खिंड म्हणजे माहुली आणि भंडारगड दरम्यानची खिंड आहे.
खिंडीच्या थोडे वर गेल्यावर उजव्या बाजूस ५०० ते ६०० फूट खाली उतरल्यावर कडालगतच कल्याण दरवाजा आहे. या दरवाज्यातून गडावर यायचे झाल्यास प्रस्तरारोहणाची गरज पडते. खिंडीतून वाटेने वर चढत गेल्यावर झाडीमध्ये बारमही पाण्याचं भुयारी टाके आहे. येथून पुढे जाणारी वाट गडाच्या दक्षिण टोकापाशी म्हणजेच भंडारगडावर घेऊन जाते. भंडारगडावरुन समोरच उभे असणारे भटोबा, नवरा व नवरीचे सुळके दिसतात. समोरच उजवीकडे असणार्या डोंगररांगेवर वजीरचा सुळका दिसतो. सभोवतालच्या परिसराचे दृश्य अतिशय रमणीय असते.






गडावर जाण्याच्या वाटा :
१)आसनगावमाग : मुंबई-नाशिक लोहमार्गावरील आसनगाव गाठावे. इथून ५ कि.मी. अंतरावरील गडाच्या पायथ्याशी असणार्या माहुली या गावी पायी अथवा रिक्षाने जाता येते. गडाच्या पायथ्याशी महादेवाचे सुंदर मंदिर आहे. रात्री तेथे राहण्याची सोय होते. इथून उजवीकडे एक ओढा पार करून ३ कि.मी. चा खडा चढ चढून जावे. वाटेत एक लोखंडी शिडी आहे. ती पार करून वर गेल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी दिसतात.या वाटेने गडावर जाण्यास २ तास पुरतात.

२)वाशिंदमार्गेः लोकलने किंवा एस्.टी. ने वाशिंदला उतरावे. उत्तरेला दहागाव आणि पुढे चाप्याचा पाडा गाठावा. चंदेरीचा डोंगर उजवीकडे ठेवून माहुलीच्या दक्षिण टोकापासून निघालेल्या व पश्चिमेला पसरलेल्या सोंडेवर चढावे. सोंडेवरून नवरा-नवरी सुळके उजवीकडे ठेवत अवघड श्रेणीचा कातळटप्पा चढून कल्याण दरवाजाने भंडारगडावर प्रवेश करावा. कल्याण दरवाजावर एक शिलालेख आढळतो. ही वाट खूप अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे साहित्य जवळ असणे आवश्यक आहे.



राहण्याची सोय : भंडारगडावर रहाण्याची कोणतीही सोय नाही. किल्ले माहुलीवर रहाण्यासाठी पहारेकर्यांच्या देवडा आहेत, पण शक्यतो हा ट्रेक एक दिवसाचाच करावा.

जेवणाची सोय : किल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावी.

पाण्याची सोय : किल्ले माहुलीवर पहारेकर्यांच्या देवडांसमोर पाण्याचे टाके आहे. येथील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे.

भंडारगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे तेथे असताना पाण्याचा साठा जवळ ठेवावा.

जाण्यासाठी लागणारा वेळ : आसनगाव मार्गेदोन तास.कल्याण दरवाजा मार्गे६ ते ८ तास.

सूचना : वाट - आसनगाव मार्गेसोपी.कल्याण दरवाजा मार्गेअवघड .